आता ST बस स्थानकातील आगार आणि आगारातील स्वच्छतागृह मोफत

ST Bus Depot and Depot Restrooms Now Free of Charge

 

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसचा वापर फक्त ग्रामीण भागातच नाही तर, शहरी भागातही मोठ्या प्रमाणावर वापर करतात. प्रवाशांच्या दृष्टीने एसटी महामंडळाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रावर मोठं संकट, राज्यात काही ठिकाणी शळांना सुट्टी;नागरिकांना सतर्कतेचं आवाहान

स्वच्छता अधिभार भरणाऱ्या प्रवाशांना एसटी महामंडळाने फार मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील कोणत्याही एसटी बस स्थानकावरील स्वच्छतागहांचा वापर केल्यानंतर प्रवाशांना पैसे द्यावे लागत होते.

राधाकृष्ण विखे पाटलांनी सांगितले भोंदू खरातकडे का गेले ?

पण आता ते पैसे द्यावे लागणार नाहीत. प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाचा वापर मोफत करण्याचा निर्णय आता एसटी महामंडळाने घेतलेला आहे. यामुळे आता प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

 

एसटी बस स्थानक आणि आगारातील स्वच्छतागृहांची स्वच्छता, पाणपोईची स्वच्छता, एसटी कर्मचाऱ्यांच्या आणि प्रवाशांच्या रेस्टरूम मधील सुविधा या सर्व गोष्टींवर आता भर देण्यात येत आहे.

 

प्रवाशांच्या सुविधेच्या दृष्टीने हा एसटी महामंडळाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या सुविधेची अंमलबजावणी महामंडळाच्या वर्धापन दिनापासून म्हणजेच 1 जूनपासून केली जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे ड्रॉयव्हर जाणार संपावर

खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून एसटी बसस्थानक आणि आगारातील स्वच्छतेची पातळी दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. या संबंधित महामंडळाला अनेक प्रवाशांनी तक्रार केलेली होती. वाढती तक्रार लक्षात घेता एसटी महामंडळाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

 

अनेक वेगवेगळ्या संस्थांकडून महामंडळाच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. बऱ्याच ठिकाणी स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी पैसे घेतले जातात. पण तरीही म्हणावी तशी स्वच्छता तिथे नसते.

महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयातच बेशुद्ध

यामुळे आता संस्थांकडे असलेल्या स्वच्छतागृहांचा वापर मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगारातील आणि स्थानकातील दुर्लक्षित पाणपोई पुन्हा सुरू करण्याबद्दल त्याचा आढावा सुद्धा घेतला जात आहे.

 

1 जूनपासून प्रवाशांना स्वच्छतागृहांचा वापर करता येणार आहे. स्थानक- आगारात प्रवाशांना स्वच्छ आणि सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देण्यासाठ एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. मिळणाऱ्या सर्व सुविधांमध्येही आणखीन दर्जा वाढवण्यात येणार आहे.

पार्थ पवार म्हणाले आता ‘काँग्रेसचा महाराष्ट्रात डाऊनफॉल होईल…ऐकुन ‘शरद पवार हसले

 

Related Articles