मंत्रिमंडळ निर्णय 5/5/2026

Cabinet Decision 5/5/2026

 

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (5 मे 2026) मंत्रिमंडळ बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.

 

सोबतच राज्यात राज्यातील शिक्षण, विद्यार्थी यांच्या हिताचे काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीत आदिवासी विकास विभागाअंतर्गत एक तर उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत दोन निर्णय घेण्यात आहेत.

उद्या 12 वी परीक्षेचा निकाल

या निर्णयांमुळे आदिवासी मुलांच्या शिक्षणप्रगतीत मोठी मदत होणार आहे. तसेच धाराशीव आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांच्या विद्यार्थ्यांनाही उच्च दर्जाचे अभियांत्रिकीचे शिक्षण अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहे.

 

आदिवासी बांधवांच्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्वपूर्ण निर्णय. स्वयंसेवी संस्थाच्या पाच प्राथमिक व १९ माध्यमिक अनुदानित आश्रमाशाळांची श्रेणीवाढ.

राज्यावर दुहेरी संकट, 24 तासाचा मोठा इशारा

प्राथमिकमधून माध्यमिक आणि माध्यमिकमधून कनिष्ठ महाविद्यालय अशी श्रेणीवाढ, त्यासाठी आवश्यक पदनिर्मिती व आवश्यक खर्चाच्या तरतूदीस मंजुरी. डोंगराळ, दुर्गम भागातील आदिवासी बांधवांच्या मुलांचे शिक्षण गतीमान होणार.

 

सोलापुरच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये या शैक्षणिक वर्षापासून (सन २०२६-२७) पदवीस्तराचे तीन अभियांत्रिकी अभ्यासक्रम सुरु करण्यास मंजुरी. सोलापूर आणि आजुबाजुच्या परिसरातील अभियांत्रिकी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या होतकरूंच्या दृष्टीने हिताचा निर्णय.

मोठा विमान अपघात टळला

प्रत्येकी साठ प्रवेश क्षमतेचे एआय अँण्ड मशिन लर्निंग, कॉम्प्युटर सायन्स अँण्ड इंजिनियरींग, इलेक्ट्रॉनिक्स अँण्ड टेलिकम्युनिकेशन असे तीन नवे अभियांत्रिकी अभ्यासक्रम.

 

धाराशिव जिल्हयातील तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माध्यमातून चालविण्यात येणारे श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालय महाराष्ट्र शासनास हस्तांतरित करण्याचा निर्णय.

चीनचे Spy Ship बंगलाच्या उपसागरात;भारतासाठी धोक्याची घंटा

महाविद्यालयाचे सक्षमीकरण होणार, अद्ययावत शैक्षणिक सोयी-सुविधांमुळे या परिसरातील होतकरूंना दर्जेदार अभियांत्रिकी शिक्षण उपलब्ध होण्याची संधी.

 

दरम्यान, या मंत्रिमंडळ बैठकीत इतरही काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री तसेच वेगवेगळ्या विभागाचे मंत्री उपस्थित होते.

 

लवकरच या निर्णयांची अंमलबजावणी केली जाईल. त्यामुळे या वर्षाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना या निर्णयांचा फायदा होणार आहे.

 

 

Related Articles