पालकमंत्री संजय बनसोडे म्हणाले ,राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार?
Guardian Minister Sanjay Bansode said: Expansion of the State Cabinet soon?
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होण्यार असल्याचं सुतोवाच राज्याचे क्रीडामंत्री परभणीचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी केलं असून ते अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलत होते.
तर नगर शहराचे राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना लवकरच मंत्रीपदाची संधी मिळेल असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.
तसंच राज्यात लोकसभा निवडणुकीत 45 प्लसचं लक्ष्य ठेवून २०२४ ला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी महायुती काम करत आहे, असंही ते म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मार्गात त्यांना ठिकठीकाणी मराठा कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत.
त्यावर क्रीडामंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी युती सरकार सकारात्मक असून इतर कोणत्याही जातीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणारचं असल्याचं म्हटलं आहे.
येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठे बदल करणार आहे. यामुळे २३ कोटी लोकांचा रोजगार जाणार आहेत. त्याचबरोबर २५ कोटी जणांना
नवीन रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नागपूर येथील आर्थिक साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असलल्याचं सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोलाही मारला.