परभणी जिल्ह्याचे नेते म्हणाले आगामी लोकसभा निवडणूकित हम साथ साथ हैं !
The leaders of Parbhani district said that in the upcoming Lok Sabha elections, we are together with each other!

आगामी लोकसभा निवडणूक महायुती लढवणार असून भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे तिन्ही पक्ष व 12 मित्रपक्ष एकदिलाने व एकत्रितपणे काम करणार असून
याबाबतची भुमिका जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी रविवारी (दि.14) महामेळावा घेण्यात येणार आहे, अशी माहिती महायुतीच्या वतीने परभणी येथे शुक्रवारी (दि.12) आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शहरातील पाथरी रोडवरील श्री रेणुका मंगल कार्यालयात रविवारी (दि.14) सकाळी 11 वाजता भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आणि 12 मित्रपक्षांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा
मकरसंक्रातीनिमित्त महामेळावा आयोजित केला आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी महायुती समन्वय समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली.
याप्रसंगी आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खा.सुरेश जाधव, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, हरिभाउ लहाने, राजेश विटेकर,
मोहन फड, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख व्यंकट शिंदे, आनंद भरोसे, भास्कर लंगोटे, सुरेश भुमरे, प्रमोद वाकोडकर, संजय शेळके, राजेश देशमुख, माधव कदम, बालाजी रूद्रवार आदी उपस्थित होते.