मनोज जरांगेनी दिला छगन भुजबळांना इशारा

Manoj Jarangeni warned Chhagan Bhujbal

 

 

 

 

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटलांनी सांगितलेल्या सर्व अटी राज्य सरकारने मान्य केल्यात. त्यामुळे ओबीसी नेत्यांनी यावर नाराजी व्यक्त केलीये.

 

 

 

 

‘मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले, परंतु तहामध्ये हरले, असं ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी म्हटलं होतं. त्यावर ‘काहीही होऊ द्या.

 

 

मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर आहे’, अशा शब्दांत मनोज जरांगेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

आमची फसगत होऊ द्या, नाहीतर काहीही होऊ द्या. मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी खंबीर आहे. आता दगाफटका झाला तर

 

 

पुन्हा आरक्षण मिळवून देईन, असं म्हणत मनोज जरांगे पाटलांनी हरिभाऊ राठोड यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

त्याचबरोबर जर मराठा आरक्षणाला धोका झाला, तर मी मंडल कमिशनला चॅलेंज करेन. असं म्हणत जरांगे पाटलांनी सरकारसह छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. ते बीडच्या नारायणगड येथे दर्शनासाठी आले असता माध्यामांशी बोलत होते.

 

 

 

यावेळी जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाला काही दगा फटका झाला तर मंडल कमिशनला मी चॅलेंज करणार आहे. पण जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत त्यांनी किती चॅलेंज करून द्या, मी मराठ्यांना आरक्षण मिळवून देईल.

 

 

 

या कायद्याचं काय करायचे करू द्या, पण मनोज जरांगे कधीही मागे हटणार नाही. त्याचबरोबर मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची असणार आहे.असंही यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *