महागाईचा पुन्हा एक धक्का ;मोबाईल रिचार्जचे दर वाढले
Another blow to inflation; mobile recharge rates hiked
महागाईचा भस्मासूर फक्त घरातील वाणसामान आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींच्या खर्चावर आणि आकडेमोडीवरच परिणाम करत नसून, हा भस्मासूर आता संपर्क साधण्याच्या माध्यमांवरही परिणाम करताना दिसत आहे.
देशात सर्वाधिक वापरात असणाऱ्या अंबानींच्या जिओ नेटवर्कमधील दरवाढीमागोमाग आता भारती एअरटेलनंही जुलै महिन्यापासून रिचार्जच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे.
चांगलं नेटवर्क आणि सेवा देण्यासाठी ग्राहकांकडून येणारी रक्कम सराकरी 300 रुपयांहून जास्त असावी अशी स्पष्ट भूमिका एअरटेलकडून मांडण्यात आली असून,
हा निर्णय उत्तम तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रममध्ये भविष्याच्या अनुषंगानं गुंतवणूक करण्यात मदत करेल असंही कंपनीकडून सांगण्यात आलं. सध्याच्या घडीला करण्यात आलेली दरवाढ किरकोळ असल्याचं म्हणत
ही दरवाढ दर दिवशी 70 पैशांहूनही कमी आहे असं सांगत प्राथमिक आणि कमी दरातील प्लॅनसाठी ही दरवाढ किमान प्रमाणात लागू करण्यात आली असून, त्यांच्यावर खर्चाचा भार येणार नाही याची काळजी घेतली गेल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
तिथं 3 जुलैपासून एअरटेलची ही दरवाढ लागू होणार असून, जिओ युजरही सध्या दरवाढीच्या या धक्क्यातून सावरत आहेत.
जिओची दरवाढही 3 जुलैपासूनच लागू होणार आहे. दरम्यान, एअरटेलची ही दरवाढ नेमकी किती आणि कोणत्या स्वरुपात आहे ते पाहा