पूर्णा शहरात ईद उत्साहात साजरी
Eid was celebrated with enthusiasm in the city of Purna

पूर्णा -शेख तौफिक
प्रेषित हजरत मोहम्मद (स) यांची ईद -ए-मिलादुन्नबी निमित्य पूर्णा शहरात धार्मिक जुलूस काढून उत्साहापूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला .
या निमित्ताने शहरातील विविध नगरात अन्नदान करण्यात आले. शहरातील मुस्लिम बांधवानी मोठ्या उत्सहात सहभाग नोंदवला .
प्रेषित हजरत मोहम्मद(स) यांच्या जयंती दि.१६ सप्टेंबर सोमवार रोजी होती परंतु श्री गणेश उत्सव सुरू असल्यामुळे शांतता नांदावी ,, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी ,
राज्यातील हिंदू-मुस्लिम या दोन्ही समाजात सलोखा कायम राहावा म्हणून राज्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी दि.१६ रोजी साजरा न करता सामाजिक बांधिलकीने तारिख वाढवून
आज १९ सप्टेंबर गुरुवार ठेवली होती. त्याच प्रमाणे सकाळी ९:३० वाजता शहरातील विविध नागरातून मुस्लिम समाज बांधव जामा मशिदी समोर जमा होऊन
मोठ्या उत्साहात ईद-ए-मिलादु नबी निमित्ताने जुलूस काढून शहरातील बसवेश्वर चौक, शिवाजी चौक, मस्तानपूरा या मार्गाने शिवाजी नगर,
कुंभार गल्ली, खुरेशी मोहल्ला येथून काढून त्याची सांगता जामा मशिदी समोर करण्यात आली.त्यानंतर व्यासपीठावर जामा मशिदीचे शाही ईमाम मौलाना हाफिज,
शमीम अहेमद रिजवी यांच्या अध्यक्षतेखाली मौलाना अ. रशीद सहाब बरकाती, मौलाना अहेमद राजा व इतर मौलानानी धार्मिक प्रवचन करून शांततेत समारोप करण्यात आला आहे.
या निमित्ताने जामा मशीद व विविध नगरात अन्नदान करण्यात आला, मिरवणूकीत पो नि विलास गोबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.