रमाई नगर,सिद्धार्थ नगर,शांती नगरातील विकास कामांचे भूमिपूजन

Bhumi Pujan for development works in Ramai Nagar, Siddharth Nagar, Shanti Nagar

 

 

पूर्णा/शेख तौफिक /9970443024

 

येथिल पालीकेच्या प्रभाग क्र.०८ मधील नगरसेविका रेखाताई अनिल खर्गखराटे यांनी प्रभागातील रमाई नगर,सिद्धार्थ नगर व शांती नगर आदीं विविध ठिकाणच्या रस्ता

 

,नाली बांधकामांसाठी निधीची उपलब्धता करून दिल्यामुळे या प्रभागातील विविध विकास कामांचे भूमीपूजन व बांधकामाचा शुभारंभ सोमवार दि.१४ आॅक्टोंबर रोजी येथिल सामाजिक कार्यकर्ते महेंद्र खर्गखराटे यांच्या हस्ते पार पडला.

 

पूर्णा नगर परिषद अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्र.०८ मधील रमाई नगर, सिद्धार्थ नगर व शांती नगर व विविध ठिकाणी रस्ता नाली बांधकाम करुन द्यावी अशी मागणी येथिल नागरिकांची होती.

 

जनतेची अडचण लक्षात घेऊन प्रभागातील नगरसेवीका रेखाताई अनिल खर्गखराटे यांनी सामाजिक कार्यकर्ते अनिल खर्गखराटे यांच्या मार्गदर्शनाखाली कामे मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला होता.

 

त्यांनी नुकतेच शासनाच्या विशेष अनुदानातून वैशिष्ट्यपूर्ण योजना,जिल्हा वार्षिक योजना, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत विविध विकास कामांना मंजुरी मिळवली आहे.

 

शासनाने या कामांसाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. आज सोमवारी १४ रोजी मंजुरी झालेल्या कामांचे येथिल सामाजिक कार्यकर्ते महेंद्र खर्गखराटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून भुमिपुजन करण्यात आले.

 

यावेळी कैलास सूर्यवंशी,कंत्राटदार गौतम भोळे,नगर अभियंता अब्दुल हकीम अब्दुल खय्युम यांची उपस्थिती होती.यानंतर माध्यमांशी बोलताना नगरसेविका रेखाताई खर्गखराटे म्हणाल्या की,

 

प्रभागातील बहुतांश रस्ते,नाली, पाणीपुरवठा, स्ट्रीट लाईट सहभागृहांचे शौचालयाचे कामे पूर्ण केली आहेत. आज शिल्लक असलेल्या अनेक कामांना सुरुवात केली आहे.सर्वाच्या सहकार्याने यापुढे ही जनतेची कामे करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *