महायुतीत फारकत घेतलेल्या नेत्यानं दिले भाजपलाच आव्हान

The leader who broke away from the Grand Alliance gave a challenge to the BJP

 

 

 

 

माझ्या विरुद्ध अजून कोणीही उमेदवार आलेला नाही आणि उमेदवारी देईपर्यंत कोणीही येईल असे मला वाटत नसल्याने मी बहुदा बिनविरोध

 

आमदार होणार असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते उत्तम जानकर यांनी लगावला आहे . माळशिरसचे विद्यमान आमदार राम सातपुते तर कदापि येथून लढायला येणार नसून

 

दुसराही कोणी पुढे येत नाही. त्यामुळेच यंदा बहुदा मी बिनविरोध आमदार होईन असा टोलाही जानकर यांनी भाजपला लगावला आहे.

 

सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जाणाऱ्या मोहिते पाटील यांच्या माळशिरस या राखीव विधानसभा मतदारसंघातून यंदा पुन्हा एकदा

 

विद्यमान आमदार राम सातपुते आणि शरद पवार गटाचे फायर ब्रँड नेते उत्तम जानकर यांच्यात लढत होईल चित्र आहे. मात्र, उत्तम जानकर यांनी आपल्या विरोधात कोणीच रिंगणात उतरणार नाही असा दावा केला आहे.

 

माळशिरस हा मोहिते पाटील यांचा गड अशी ओळख असून गेल्यावेळी मोहिते पाटील भाजपसोबत असल्याने भाजपने पहिल्यांदाच माळशिरस येथे विजय मिळविला होता, असं उत्तमराव जानकर म्हणाले.

 

 

आता लोकसभेला उमेदवारी नाकारल्यानंतर मोहिते पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून माढा लोकसभेचे खासदार झाले. मोहिते पाटील

 

आणि उत्तम जानकर यांचे 35 वर्षांचे वैर लोकसभा निवडणुकीत संपुष्टात आणण्याचे काम शरद पवार यांनी केले होते. त्यामुळेच माळशिरस येथील लढाई ही शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची आहे.

 

 

सध्या भाजप विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्याच्या तयारीत असल्याने माळशिरस येथून पुन्हा आमदार राम सातपुते आणि उत्तम जानकर अशी लढत होईल असे चित्र होते.

 

मात्र, आज जानकर यांनी आपल्या विरोधात राम सातपुते कधीही माळशिरस मधून निवडणूक लढवत नसतो असा दावा केल्याने खरेच महायुतीकडे माळशिरस येथून

 

लढण्यासाठी उमेदवार मिळत नाही का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच उत्तमराव जानकर यांनी यंदा बहुदा मी बिनविरोध आमदार होणार असा दावा केला आहे .

 

माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा अनूसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील

 

यांना या मतदारसंघातून 134279 मतं मिळाली. तर, भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 64145 मतं मिळाली होती. या मतदारसंघावर मोहिते पाटील यांचं एकहाती वर्चस्व आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *