नवाब मलिकांचा भाजपा नेत्यांना इशारा; खबरदार …..

Nawab Malik's warning to BJP leaders; Watch out.....

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नवाब मलिक यांना मानखुर्द शिवाजी नगर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या उमेदवारीला भाजपाने विरोध केला.

 

त्यामुळे महायुतीतील वाद समोर आलाय. नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार नसल्याचं भाजपाने स्पष्ट केलंय. तसंच, नवाब मलिकांचे दाऊदशी संबंध असल्याचंही भाजपा नेते म्हणत आहेत. यावरून नवाब मलिकांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिलाय. .

 

“दाऊदशी संबंध असल्याचे माझ्यावर जे आरोप करतात त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे. गुन्हेगार, दहशतवादाचा कोणताही खटला माझ्यावर नाही.

 

जे लोक माझ्यावर असे आरोप करत त्यांच्याविरोधात मी वरच्या न्यायालयात धाव घेणार आहे. मी बदनामीचा खटला टाकणार आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे आहेत”, असं नवाब मलिक म्हणाले.

 

दरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांविरधात भूमिका घेतली आहे. तसंच, “दाऊद इब्राहिमशी संबंधित खटल्यातील व्यक्तीच्या प्रचारात आम्ही सहभागी होणार नाही”, असं भाजपा नेते आशिष शेलार म्हणाले होते.

 

भाजपाच्या या नेत्यांवर नवाब मलिकांनी टीका केली. ते म्हणाले, “कितीही मोठा नेता असला तरीही मी कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या प्रचाराला या असा मी आग्रह करत नाही.

 

जनतेचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. या आधारावर निवडणूक लढतो. दाऊदचं नाव माझ्याशी जोडणाऱ्यांवर कायदेशीर करणार आहे. मी माझ्या विचारधारेला कधीही सोडणार नाही.”

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *