काँग्रेसची फजिती;अधिकृत उमेदवाराची माघार ,अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ
Congress fidget; withdrawal of official candidate, time to support independent candidate

अर्ज माघारीच्या दिवशी बंडखोरांवर सर्वाचे लक्ष असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे अधिकृत
उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याने एकच खळबळ उडाली. कोल्हापूर उत्तर मतदारसंघ जागावाटपाची चर्चा सुरू असल्यापासून चर्चेत होता.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने राजेश लाटकर यांना उमेदवारी दिली होती. लाटकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसमधील अनेकांनी त्याला विरोध केला होता.
शहर काँग्रेस कार्यालयावर दगडफेकीचे प्रकार देखील घडले होते. त्यामुळे काँग्रेसने येथून उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला. पक्षाने मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली.
त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल देखील केला.मात्र दुसऱ्या बाजूला राजेश लाटकर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला होता. अखेरच्या दिवसापर्यंत लाटकरांनी अर्ज मागे न घेतल्याने मतदारसंघात त्यांचे आव्हान कायम होते.
अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे यांनी माघार घेतली. जिल्हाधिकारी कार्यालायत खासदार शाहू महाराजसह मधुरिमाराजे यांनी माघार घेत असल्याचा अर्ज दिला.
या माघारीनंतर काँग्रेसकडून मोठी प्रतिक्रिया आली आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचा राजेश लाटकरांना पाठिंबा असल्याचे सांगितले. काँग्रेसचा लाटकरांना पाठिंबा असेल आणि त्यांना विजय करू, असे नाना म्हणाले.
मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्यानंतर खासदार शाहू महाराज यांनी नाइलाजाने मधुरिमाराजे यांनी माघार घेतल्याचे सांगितले. काँग्रेसचे कार्यकर्ते राजेश लाटकर यांनी देखील
उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यांनी माघार न घेतल्याने आम्ही निवडणुकीतून माघार घेत असल्याचे शाहू महाराजांनी सांगितले.