20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

November 20 declared public holiday

 

 

 

भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर 2024 रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यातील विधानसभा सार्वत्रिक-2024चा कार्यक्रम जाहीर केला आहे.

 

या निवडणुकीचे मतदान दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये 18 वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा,

 

यासाठी लोकप्रतिनिधीत्व कायदा, 1951 मधील कलम 135 (ब) नुसार उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या दि. 24 ऑक्टोबरच्या शासन परिपत्रकानुसार

 

हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यास सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. या दिवशी मोठ्या संख्येने मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 

 

निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रातील कोणत्याही व्यवसायात, व्यापारात, औद्योगिक उपक्रमात किंवा इतर कोणत्याही आस्थापनेमध्ये कार्यरत असलेल्या आणि

 

राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल.

 

सदर सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना इत्यादींना लागू राहील.

 

मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सुट्टी देण्यात येते किंवा कामाच्या ठिकाणी योग्य ती सवलत देण्यात येते.

 

मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये संस्था, खासगी आस्थापना इत्यादी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागते.

 

ही बाब लक्षात घेऊन या विधानसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे.

 

ही सुट्टी उद्योग विभागांतर्गत येणाऱ्या सर्व उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना आदींना लागू राहणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत कामगार,

 

अधिकारी, कर्मचाऱ्यांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत मिळणार आहे.

 

 

कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल, याची दक्षता संबंधित आस्थापनांनी घेणे आवश्यक आहे.

 

उद्योग विभागांतर्गत येणारे सर्व महामंडळे, उद्योग समूह, कंपन्या व संस्थांमध्ये, औद्योगिक उपक्रम इत्यादींच्या आस्थापनांनी या सूचनांचे योग्य अनुपालन होईल,

 

याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत

 

तक्रार आल्यास त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *