पाहा;VIDEO सॉकर सामन्यादरम्यान नेदरलँडमध्ये इस्रायली लोकांवर हल्ले
Attacks on Israelis in the Netherlands during a soccer match
नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅम येथे गुरुवारी रात्री इस्रायली समर्थकांवर झालेल्या हल्ल्यात अनेक लोकं जखमी झाले आहेत. त्यापैकी पाच जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सॉकर सामन्यादरम्यान हे हल्ले सुरू झाले. स्टेडियमच्या बाहेरही इस्रायली लोकांना लक्ष्य करण्यात आले. युरोप लीगचा हा सामना Ajax आणि Maccabi तेल अवीव संघांमध्ये होता.
संपूर्ण सामन्यात जोरदार हंगामा पाहायला मिळाला. पोलिसांनी 62 हल्लेखोरांना अटक केली आहे. आता माहिती अशी आहे की, ॲमस्टरडॅममध्ये प्रचंड पोलीस तैनात असूनही, इस्रायली संघाच्या समर्थकांवर अनेक ठिकाणी हल्ले करण्यात आले.
पोलिसांनी अनेक ठिकाणी इस्रायली लोकांची सुटका करुन त्यांना त्यांच्या हॉटेलमध्ये नेले. या हल्ल्यांमध्ये अनेक इस्रायली नागरिक जखमी झाले आहेत.
सामन्यापूर्वी स्टेडियमजवळ पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनास महापौरांनी परवानगी नाकारल्यानंतर हे हल्ले झाले. सामन्यादरम्यान पॅलेस्टाईन समर्थकांनी परिसरात मिरवणूक काढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तणाव वाढण्याच्या भीतीने पोलिसांनी लोकांना पुढे जाऊ दिले नाही.
इस्रायल आणि नेदरलँडच्या नेत्यांनी इस्रायली लोकांवर झालेल्या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला आहे. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने या हल्ल्यांचा निषेध केला आहे.
इस्रायली लोकांनी परत आणण्यासाठी इस्रायलने ॲमस्टरडॅमला दोन विमाने पाठवली आहेत, तर नेदरलँडचे पंतप्रधान डिक शूफ यांनी इस्रायली समर्थकांवरील हल्ले पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचे म्हटले आहे. ते या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी शूफ यांनी चर्चा केल्याचे सांगितले. नेदरलँडच्या सरकारने एक निवेदन जारी केले आहे की इस्रायल समर्थकांविरुद्ध अशा व्यापक हिंसाचार अस्वीकार्य आहे.
अशा प्रकारच्या हिंसाचाराचा कोणत्याही प्रकारे बचाव करता येणार नाही. धर्मविरोधी वर्तन खपवून घेतले जाणार नाही. दोषींवर कारवाई केली जाईल.
पोलीस अधिकाऱ्यांनी ज्यू संस्था आणि वस्त्यांभोवती सुरक्षा वाढवली आहे. यासोबतच राजधानीत पोलिसांची गस्तही वाढवण्यात आली आहे.
ॲमस्टरडॅममध्ये ज्यू समुदायाचे लोकं मोठ्या संख्येने राहतात आणि हे शहर दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रसिद्ध ॲन फ्रँक आणि कुटुंबाचे आश्रयस्थान होते.
The scenes from Amsterdam remind us all of Europe’s darkest days.
Jews being hunted and beaten on the streets of Europe should be a wake up call for anyone who still needs it about the rise of antisemitism and the dangers of extremism.
— יאיר לפיד – Yair Lapid (@yairlapid) November 8, 2024