फोटोच्या अँगलमध्ये येणाऱ्या कार्यकर्त्याला भाजपच्या माजी केंद्रीय मंत्र्याने मारली लाथ ;”या” VIDEO ची होतेय राज्यभरात चर्चा

BJP's former union minister kicks an activist coming in the angle of the photo; "This" VIDEO is going viral

 

 

 

 

माजी मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे त्यांच्या हटके स्टाईलमुळे नेहमी चर्चेत असतात. कधी ते कणीस भाजताना दिसतात. सध्या त्यांच्या नव्या स्टाईलचा आणखी एक व्हिडीओ समोर आलाय.

 

शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. या भेटीवेळी दोघ फोटो काढण्यासाठी उभे राहिले, तेव्हा एक कार्यकर्ता आडवा आला. त्यामुळे दानवेंनी त्यांच्या हटके स्टाईला लाथ मारत कार्यकर्त्याला बाजूला केले.

 

दरम्यान, रावसाहेब दानवे यांचा हा व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दाखवलाय. सुषमा अंधारे म्हणाल्या, अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही.

 

माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय.

 

असे व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं की, भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागवतात. 20 तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा.

 

रावसाहेब दानवे म्हणाले, विधानसभेच्या निवडणुका आहेत. मी भाजपचा या राज्याचा नेता म्हणून राज्यभर दौरे करतोय. आमचे नेते अमित शाह हे मुंबईला येऊन गेले.

 

त्यांनी आम्हाला स्पष्ट सूचना दिल्या. एनडीएच्या विरोधात कोणतंही स्टेटमेंट कोणतंही वागणं नसलं पाहिजे. सगळ्यांना निवडून आणण्याची भूमिका पाहिजे. त्या पद्धतीने मी पक्षाची शिस्त पाळणार माणूस आहे.

 

रावसाहेब दानवे यांच्या भेटीनंतर अर्जुन खोतकर म्हणाले, रावसाहेब दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे.

 

ज्या जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकडून घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायच्या ठरवलं. पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार,

 

दोन पक्षांनी एकत्र येत नवा संकल्प करण्याचं ठरवलंय. आर्शीवाद दादांनी आम्हाला दिलेले आहे. भविष्यकाळात जे काही होईल ते निश्चितपणे चांगलं होईल.

 

यापूर्वी जे झालं तो भूतकाळ झाला. भविष्यकाळात नवी संकल्प आहे. माझ्यामध्ये आणि दादामध्ये मनभेद आहेत, असा संभ्रम जनतेत निर्माण केला जातोय हा भ्रम या भेटीमुळे दुर होईल

 

आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये महायुतीचे सर्व एकजुटीने काम करतील. साहेबांना मी दुपारच्या सभेसाठी निमंत्रण देण्यासाठी आलो होतो, ते तिथे उपस्थित राहणार आहेत.

 

रावसाहेब दानवे राज्याचे नेते आहेत, त्यांचा फायदा होईल. आमचे कार्यकर्ते देखील महायुतीचं काम करतील. भाजपचं काम करतील. आम्ही दोघंही वाघ आहेत, काही विषय नाही.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *