मनोज जरांगेना आमदार नितेश राणे यांनी दिला कडक इशारा
Manoj Jarangena MLA Nitesh Rane warned
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणात खोड्या करत आहेत, अशी टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत. त्यामुळे तेच याच्यात खोड्या करत असल्याचा आरोप जरांगे यांचा आहे.
त्यांना उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत राहा, त्याचं आम्ही स्वागतच करु. परंतु ज्या फडणवीसांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं, योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात भूमिका घ्याल तर गाठ मराठ्यांशी आहे.
निलंगा येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही. ते कामातून गेले आहेत. त्यांनी आता लवकर गोळ्या सुरू करून घेतल्या म्हणजे बरं होईल.
प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता राहावी म्हणून फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली ती चूक झाली असं म्हणायचं का त्यांना? आरे व्वा मग चांगला मराठ्याचा नेता आहे.
सध्या तो लोंढा का खोंढा वळवळ करतोय हे सगळेच फडणवीसांच्या ताटात जेवणारे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत? ‘बघुया.. आहोत शांत तर शांत राहू द्या.. कशाला वातावरण ढवळीता अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.
जरांगे पुढे म्हणाले की, तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असतील तर मराठ्यांच्या डोक्यात नका उतरवू, तुमच्या ताटात जेवणारी माणसं असे वक्तव्य करीत असातील तर चांगली गोष्ट नाही.
बरळा तुम्हाला काय बरळायचे ते, पुढं सामना मैदान सोबतच आहे बघू. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यावर आता विश्वासच राहिला नाही, अशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.