नागपुरात प्रियंका गांधींच्या रॅलीदरम्यान मोठा राडा, काँग्रेस-भाजपचे कार्यकर्ते भिडले
Congress-BJP activists clash during Priyanka Gandhi's rally in Nagpur

नागपूरमधील प्रियांका गांधी यांच्या रोड शो दरम्यान मोठा राडा झाला आहे. रोड शो दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी रॅलीमध्ये झेंडे मिरवले आहेत.
काँग्रेसचा प्रचार हिंदूविरोधी आहे असे म्हणत भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. यामुळे भाजपचे आणि
काँग्रेसचे कार्यकर्ते आमनेसामने आले. परिणामी रोड शो दरम्यान कार्यकर्ते भिडल्याने काही काळासाठी वातावरण तापले होते.
नागपूर पश्चिमचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी यांचा रोड शो आयोजित कऱण्यात आला होता.
रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांसह हजारो नागरिक देखील सहभागी झाले होते. ही रॅली नागपूरच्या बडकर चौकात येताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरु केली.
त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी्ही आक्रमक होत भाजपच्या कार्यकर्त्यांना जाऊन भिडले. यामुळे नागपूरातील वातावरण चांगलेच तापले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
प्रियांका गांधी यांचा रोड शो संघाच्या मुख्यालयाजवळ येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली होती. यासाठी भाजपचे कार्यकर्ते सकाळपासून तेथे जमले होते.
काँग्रेस कार्यकर्ते देखील तयारीत होते. रोड शो संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते देखील बडकत चौकात आले आणि दोन्ही बाजू्च्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी सौम्य बळाचा वापर केल्याची माहिती आहे.
महाविकास आघाडीचे काँग्रेसचे पश्चिम नागपुरचे उमेदवार विकास ठाकरे आणि मध्य नागपुरचे काँग्रेस उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांनी ‘रोड-शो’ केला.
प्रियंका गांधीं यांनी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात अवस्थी चौक ते दिनशॉ फॅक्ट्री चौकपर्यंत हा रोडशो केला. त्यानंतर मध्य नागपुरात गांधी गेट ते बडकस चौक असाही त्यांचा एक रोड शो झाला.
नागपुरातील बडकस चौकातील प्रियंका गांधींच्या रोड शोसाठी लावण्यात आलेले पोस्टर फाडण्यात आले होते.काही भागातील फुगे आणि झेंडेही अज्ञातांकडून काढण्यात आले होते. त्यामुळे राडा होण्याची शक्यता आधीच वर्तवण्यात येत होती.