महायुतीच्या लाटेत किती मुस्लिम उमेदवरांचा झाला विजय ?

How many Muslim candidates won in the Mahayuti wave?

 

 

 

महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं आहे. २३९ जागा जिंकून महाराष्ट्रात महायुतीने मैदान मारलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत २८८ जागा आहेत त्यापैकी २३९ जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात प्रचार जोरदार सुरु होता. काही घोषणाही देण्यात आल्या. यावरुन चर्चा होते आहे ती महाराष्ट्रात मुस्लीम उमेदवार किती निवडून आले, जाणून घेऊ.

 

अबू आझमी मानखुर्दमधून विजयी
मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार अबू आझमी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी एआयएमआयएमचे उमेदवार अतिक अहमद खान यांचा पराभव केला. अबू आझमी यांनी AIMIM उमेदवाराचा १२ हजार ७५३ मतांनी पराभव केला.

 

आझमी यांना ५४ हजार ७८० मतं मिळाली. अतिक अहमद खान यांना ४२ हजार २७ मते मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार नवाब मलिक यांचा दारूण पराभव झाला. नवाब मलिक यांना केवळ १५ हजार ५०१ मतं मिळाली.

 

हसन मुश्रीफ कागलमधून विजयी
कागल विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे (अजित गट) उमेदवार हसन मुश्रीफ यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार घाटगे समरजीत सिंह विक्रम सिंह यांचा ११ हजार ५८१ मतांनी पराभव केला. मुश्रीफ हसन यांना १ लाख ४५ हजार २६९ मते मिळाली आहेत, तर घाटगे समरजितसिंह विक्रम सिंह यांना १३ लाख ३ हजार ६८८ मतं मिळाली आहेत.

 

रईस कासम शेख भिवंडीतून विजयी
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस कासम शेख विजयी झाले. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार संतोष मंजे शेट्टी यांचा ५२ हजार १५ मतांनी पराभव केला. सपा उमेदवाराला १ लाख १९ हजार ६८७ मते मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेले शिवसेनेचे उमेदवार संतोष मंजे शेट्टी यांना ६७ हजार ६७२ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मनसेच्या उमेदवाराला केवळ १ हजार ३ मतं मिळाली.

 

 

सना मलिक यांचा विजय
माजी मंत्री नवाब मलिक यांची मुलगी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) उमेदवार सना मलिक यांनी अणुशक्ती नगर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे (शरद गट) उमेदवार आणि स्वरा भास्कर यांचे पती फहाद अहमद यांचा ३ हजार ३७८ मतांनी पराभव केला. सना मलिक यांना ४९ हजार ३४१ मते मिळाली आहेत. तर फहाद अहमद यांना ४५ हजार ९६३ मतं मिळाली आहेत.

 

 

हारून खान वर्सोव्यातून विजयी
वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे एकमेव मुस्लिम उमेदवार (उद्धव गट) हारून खान यांनी भाजप उमेदवार डॉ. भारती लवेकर यांचा १ हजार ६०० मतांनी पराभव केला. शिवसेनेच्या एकमेव मुस्लिम उमेदवाराला ६५ हजार ३६ मते मिळाली आहेत. तर त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी भारती लवेकर यांना ६३ हजार ७९६ मतं मिळाली आहेत.

 

 

अस्लम शेख मालाडमधून विजयी
मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार अस्लम रंजनाली शेख यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी भाजपा उमेदवार विनोद शेलार यांचा ६ हजार २२७ मतांनी पराभव केला आहे. अस्लम रंजनाली शेख यांना ९८ हजार २०२ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांना ९१ हजार ९७५ मते मिळाली आहेत.

 

मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक मालेगावमधून विजयी
मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातून एआयएमआयएमचे उमेदवार मुफ्ती मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार आसिफ शेख रशीद यांचा पराभव केला.

 

 

साजिद खान पठाण अकोल्यातून विजयी
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार साजिद खान पठाण 1 हजार २८३ मतांनी विजयी झाले आहेत. साजिद खान यांना ८८ हजार ७१८ मते मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार अग्रवाल विजय कमलेश्वर यांना ८७ हजार ४३५ मते मिळाली आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर असलेले अपक्ष उमेदवार हरीश रतनलाल अलीमचंदानी यांना २१ हजार ४८१ मतं मिळाली आहेत.

 

 

अमीन पटेल मुंबादेवीतून विजयी
मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून अमीन पटेल यांनी काँग्रेसच्या चिन्हावर शिवसेनेच्या उमेदवार शायना एनसी यांचा ३४ हजार ८८४ मतांनी पराभव केला आहे. शायना एनसी या भाजपच्या भक्कम नेत्या आहेत. जागावाटपात मुंबादेवीची जागा एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली. निवडणुकीपूर्वी शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि तिकीटही मिळवलं.

 

 

अब्दुल सत्तार विजयी
सिल्लोड विधानसभा जागेवर अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेचे उद्धव ठाकरे उमेदवार सुरेश बनकर यांचा २४२० मतांनी पराभव केला. अब्दुल सत्तार यांना १ लाख ३७ हजार ९६० मते मिळाली. तर सुरेश बनकर यांना १ लाख ३५ हजार ५४० मतं मिळाली. महाराष्ट्रात पार पडलेल्या निवडणूक निकालांमध्ये १० मुस्लिम उमेदवार निवडून आले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *