बीड मधील देशमुख मर्डर केस मध्ये आता बडी मुन्नीची इंट्री ;सुरेश धसांनी सगळंच सांगितलं

Now Badi Munni's entry in the Deshmukh murder case in Beed; Suresh Dhasan told everything

 

 

 

संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सध्या राजकीय वातावरण तापलं असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आमदार सुरेश धस यांच्यावर आमदार अमोल मिटकरी यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले होते.

 

आता, या आरोपावर सुरेश धस यांनी पलटवार करत राष्ट्रवादीतील बडी मुन्नी म्हणत नवाच प्रश्न उपस्थित केलाय. अमोल मिटकरी, सूरज चव्हाण यांच्यासारख्या बारक्या-सारक्या लेकरांना कशाला बोलायला लावतो.

 

बडी मुन्नीनं पुढं यावं, बडी मुन्नीलाही माहितीय. त्या मुन्नीनं पुढं यावं, मी मुन्नीची सुन्नी करतो अशा शब्दात सुरेश धस यांनी आता नवाच बॉम्ब टाकला आहे. तसेच, अमोल मिटकरींचा बोलवता धनी हा बडी मुन्नी असल्याचेही त्यांनी सूचवले.

 

त्यामुळे, महायुतीमधील राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच खडाजंगी होत असल्याचे दिसून येते. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले होते.

 

धस यांच्यावर खंडणी, हत्या व जमिनी बळकावल्याचे गुन्हे असल्याचा गंभीर आरोप मिटकरींनी केला होता. त्यानंतर, आमदार धस यांनी त्यांच्यास्टाईलने टीका केलीय.

 

अमोल मिटकरी हे पहिली दुसरीच्या वर्गात आहेत, चड्डीत असल्यापासुन ते आतापर्यंत तुम्ही जे आरोप केले आहेत त्या सर्वात क्लिनचीट मिळाली आहे. संतोष देशमुख खुनापासुन लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे,

 

माझाही सिडीआर काढा. मी कोणत्या कामासाठी वाल्मिक कराडला फोन केला, कोणत्या कारणासाठी केला होता तेही त्यांनी जाहीर करावं,

 

असा पलटवार आमदार सुरेश धस यांनी अमोल मिटकरींच्या टीकेवर केला असून मिटकरींच्या टीकेला मी महत्त्व देत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

 

खुन्यांना पाठीशी राष्ट्रवादी घालते का?, मी अजित पवार यांचीही भेट घेतली होती, त्यावेळी यांना जवळ ठेवू नका अशी मागणी केली होती, असे धस यांनी सांगितले.

 

तसेच, अमोल मिटकरी यांचा तेरेनाम झाला आहे, कोण ओबीसी नेता, कोण हाके?, असे म्हणत मिटकरी व हाकेला महत्त्व देत नसल्याचेही धस यांनी म्हटले. संतोष देशमुख यांच्या दोषीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे

 

आणि त्यात कोणी असेल त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. राष्ट्रवादीवाले तुम्ही खुन्यांना पाठीशी घालत आहात, पण मेलेल्या माणसांच्या बाजूने उभे रहा. अमोल मिटकरी स्वत: बोलत नाही,

 

कोणतरी मुन्नी आहे ती बोलवायला लावते. बडी मुन्नी आहे ती बोलायला लावते, असे म्हणत आमदार धस यांनी अमोल मिटकरींचा बोलवता धनी कोणतरी दुसराच असल्याचे सूचवले आहे. राष्ट्रवादीमधील बदनाम मुन्नी आहे, ती वारंवार बोलायला लावते, अशी टीकाही सुरेश धस यांनी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *