मंत्री धनंजय मुंडेंचा मुलगा बेरोजगार’, करुणा मुंडेंचे वक्तव्य चर्चेत

Minister Dhananjay Munde's son is unemployed, Karuna Munde's statement is in the news

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक न्यायालयात गेलेल्या करुणा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

कौटुंबिक न्यायालयाने अंतरिम निकाल देत असताना तक्रारदार करुणा मुंडे यांना दरमहा १ लाख २५ हजार तर त्यांच्या मुलीला ७५ हजार रुपये असे एकूण दोन लाख रुपये देखभाल खर्च देण्याचा निकाल दिला आहे.

 

दरम्यान हा देखभाल खर्च कमी असून मासिक १५ लाख रुपये देखभाल खर्च म्हणून द्यावा, अशी मागणी करत आता उच्च न्यायालयात जाणार असल्याचे करुणा मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच वाल्मिक कराडचा उल्लेख करत त्यांनी आपल्या मुलाबाबतही भाष्य केले.

 

प्रसारमाध्यमांशी बोलत असताना करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी वाल्मिक कराडचाही उल्लेख केला.

 

त्या म्हणाल्या, नोकराकडे ४ हजार कोटींची संपत्ती आढळून आली. पण मुंडेंचा एकुलता एक मुलगा २१ वर्षांचा असून त्याच्याकडे काहीच काम नाही.

 

जनतेला मी हे सांगू इच्छिते की, मंत्र्याच्या मुलाकडे एक रुपयाचीही संपत्ती नाही. वाल्मिक कराडचा मुलगा कोट्यवधींच्या गाडीत फिरतो. पण आमच्या मुलाकडे एकही गाडी नाही. आमची मुलगी ट्रेनमधून फिरते.

 

खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, यापुढे माझा उल्लेख करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे असा करावा. कारण न्यायालयाने मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे.

 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली होती.

 

त्यांचे आरोप वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाने अंशतः मान्य केले आहेत. वृत्तवाहिनीशी बोलताना करुणा मुंडे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, मी १५ लाख प्रति महिना पोटगी मिळावी म्हणून मागणी केली होती.

 

मात्र न्यायालयाने दोन लाख पोटगी देण्याचा निर्णय घेतला आहे. पोटगी वाढवून मिळण्याबाबत उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान ही पोटगी करुणा मुंडे आणि त्यांच्या मुलीला वाटून देण्यात येणार आहे.

 

करुणा मुंडे पुढे म्हणाल्या की, मागच्या तीन वर्षांपासून मी खूप त्रास भोगला आहे. पोटगीसाठी मला खूप संघर्ष करावा लागला. पतीशिवाय एका महिलेला जीवन जगणे खूप अवघड असते.

 

आपला पती जेव्हा उच्च पदावर असतो, तेव्हा पूर्ण व्यवस्था त्याच्याबाजूने काम करत असते. त्यांच्याकडे मोठे वकील होते. तरीही मी ही लढाई लढली. माझ्या वकिलांनी प्रामाणिकपणे लढून मला न्याय मिळवून दिला, याबद्दल मी त्यांचेही आभार मानते.

 

खटल्याबाबत माहिती देताना करुणा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांची मी पत्नी आहे की नाही? हे आधी आम्हाला सिद्ध करावे लागले. जे आमच्या वकिलांनी सिद्ध करून दाखवले आहे.

 

करुणा मुंडे यांचे वकील गणेश कोल्हे यांनी संवाद साधताना म्हटले की, करुणा मुंडे यांना मासिक १ लाख २५ हजार आणि मुलीला लग्नापर्यंत मासिक ७५ हजार रुपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

 

बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, यापुढे माझा उल्लेख करुणा शर्मा नाही तर करुणा धनंजय मुंडे असा करावा. कारण न्यायालयाने मला पहिल्या पत्नीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे मी मुंडे नावासाठी जी लढाई लढत होती, ती यशस्वी झाली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *