करुणा शर्मा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी
Karuna Sharma Dhananjay Munde's first wife

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून,
या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांना पत्रकार परिषद घेताना अश्रू अनावर झाले. आपण रखेल नसून, त्यांची पहिली पत्नी आहोत असं यावेळी त्यांनी सांगितलं.
“माझ्या लढ्याला यश आलं आहे. कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिला आहे. बायको नसून, देखभाल खर्चासाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही.
मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे. माझा 1 लाख 70 हजारांचा घराचा हफ्ता आहे. 7 ते 8 महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घऱात बेरोजगार बसला आहे. 2 लाखात काय होणार?,” अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केली आहे.
“आज माझ्या घरात या निर्णयावर व्यक्त होण्यासाठी कोणी नाही. आई होती तिचं निधन झालं आहे. महिलांचा लढा खूप मोठा असतो. मी गेल्या 3 वर्षांपासून एकटी लढत आहे. माझ्याकडे पैसे नव्हते, माझे सगळे दागिने विकले आहेत. माझी फार अवघड परिस्थिती होती. बीडवरुन मुंबईला येणं आणि बीडला जाणं,” हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले.
पुढे त्यांनी सांगितलं की, “जिल्हाधिकारी कार्यालयात मला गुंडाने मारहाण केली होती. वाल्मिक कराडसारख्या गुंडाने एका महिलेला मारलं होतं. चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श कऱण्यात आला होता.
घरी आल्यावर मी मुलांना सांगितलं होतं. तेव्हा पतीने आई खोटं बोलत असल्याचं सांगितलं. मग मुलांनीही त्यावर विश्वास ठेवला. पण एक बाई खोटं बोलत नाही”.
“मी ठेवलेली बाई नाही, मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. हीच माझी लढाई होती आणि आज त्याचाच विजय झाला आहे. मला भारतातील महिलांना एकच सांगायचं आहे की, समोरचा मोठा माणूस आहे,
मंत्री, पैसेवाला हे पाहून शांत बसू नका. मी लढाई सुरु केली तेव्हा एक रुपया नव्हता. घर कर्जात होतं. माझी गाडी उचलण्यात आली. आमच्याकडे घराचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नव्हते”, असंही त्या म्हणाल्या.
“माझ्या बहिणीसोबतही शारिरीक हिंसाचार झाला. मला दोन खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. 45 दिवस मी येरवाडा जेलमध्ये होते. मला कोणी भेटण्यासही आलं नाही.
कोण मला काढणार याची वाट पाहत होते. बीडच्या जेलमध्ये मी 16 दिवस होता. कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली जाते. माझ्या गालावर मारलं, चुकीच्या जागी हात लावतो आणि महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री काही करत नाही. मी कधीच आत्महत्या केली असती. एकदा प्रयत्नही केला. पण मला मुलांचा चेहरा पाहण्यास सांगण्यात आलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
“धनंजय मुंडे, पोलीस तिथे असताना सर्वांसमोर जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मला मारहाण करण्यात आली. वाल्मिक कराडने ज्यावेळी मला मारहाण केली तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि डीजींना निवेदन दिलं. मला फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या इतकी मागणी होती. पण आजपर्यंत ते मिळालेलं नाही,” असा आरोप त्यांनी केला आहे.
धनंजय मुंडे त्यांच्या खासगी आयुष्यातील प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी करुणा शर्मा यांना मेंटेनन्स देण्याचा निर्णय कोर्टाने जाहीर केलाय. यावर आता धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
करुणा मुंडे यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा आणि कुठल्याही प्रकारची दुखापत करण्यात येऊ नये असे निर्देश आणि 1,25,000 रुपयाचा मासिक खर्च देण्यात यावा असे निर्देश कोर्टाने दिले. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखिल कोर्टानं मान्य केला आहे.
71 वे न्यायालयाचे उपदंडाधिकारी यांनी दिलेल्या निर्णयासंदर्भात धनंजय मुंडे यांनी आपल्या वकिलाच्या माध्यमातून स्पष्टीकरण जाहीर केले आहे. या आदेशाबाबत चुकीच्या अहवालांचा संदर्भ देण्यात येत असल्याचे ते म्हणाले. करुणा शर्मा यांनी 2022 मध्ये घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत मासिक भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
अंतरिम टप्प्यावर न्यायालयाने भरपाईसाठी आदेश दिला आहे. महत्त्वाचे म्हणजे न्यायालयाने घरगुती हिंसाचाराचा कोणताही निष्कर्ष काढलेला नसल्याचे धनंजय मुंडेंच्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. हा आदेश केवळ आर्थिक विचारांवर आधारित अंतरिम भरपाई देण्याचे निर्देश देतो, जो कथित हिंसाचाराच्या कोणत्याही आरोपांवर आधारित नसल्याचे त्यांनी म्हटले.
आदेशाच्या संबंधित भागात, परिच्छेद 25, असे म्हटले आहे, ‘अर्जदार क्रमांक 1 आणि क्रमांक 3 च्या मूलभूत गरजा, त्यांचे उत्पन्न आणि प्रतिवादीची जीवनशैली लक्षात घेता, माझे असे मत आहे की त्यांना घरगुती हिंसाचार कायद्याच्या कलम 20 अंतर्गत पोटगी मिळण्यास पात्र आहे. म्हणून, प्रतिवादीकडून अर्जदार क्रमांक 1 ला दरमहा 1 लाख 25 हजार आणि अर्जदार क्रमांक 3 ला दरमहा 75 हजार इतकी अंतरिम भरपाईची रक्कम पुरेशी आहे.’
धनंजय मुंडेंच्या वकिलांनी म्हटलंय की, ‘माझ्या अशिलाविरुद्ध कोणताही प्रतिकूल निकाल नाही. हा आदेश केवळ अर्जदारांच्या आर्थिक गरजांवर आधारित देण्यात आला आहे, कोणत्याही चुकीच्या कृत्याच्या आधारावर नाही. धनंजय मुंडे यांनी स्वतः शर्मा आणि त्यांच्या मुलांसोबत पूर्वी लिव्ह-इन संबंध असल्याचे कबूल केले होते, ज्यामुळे या आदेशाचा आधार बनला.’
धनंजय मुंडे आणि पोलिसांसमोर मला जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मारहाण करण्यात आली असा गौप्यस्फोट करुण शर्मा यांनी केला आहे. वाल्मिक कराडने ज्यावेळी मला मारहाण केली तेव्हा मी जिल्हाधिकाऱ्यांना, मुख्यमंत्र्यांना आणि डीजींना निवेदन दिलं. मला फक्त सीसीटीव्ही फुटेज द्या इतकी मागणी होती.
पण आजपर्यंत ते मिळालेलं नाही असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने करुणा शर्मांना 2 लाखांची देखभाल खर्च देण्याचा आदेश दिला आहे. करुणा शर्मा याच धनंजय मुंडे यांच्या प्रथम पत्नी असल्याचा कोर्टाचा निर्वाळा असून, या प्रकरणात घरगुती हिंसाचार झाल्याचा दावा देखील कोर्टानं मान्य केला आहे.
“जिल्हाधिकारी कार्यालयात मला गुंडाने मारहाण केली होती. वाल्मिक कराडसारख्या गुंडाने एका महिलेला मारलं होतं. चुकीच्या पद्धतीने मला स्पर्श कऱण्यात आला होता. घरी आल्यावर मी मुलांना सांगितलं होतं. तेव्हा पतीने आई खोटं बोलत असल्याचं सांगितलं. मग मुलांनीही त्यावर विश्वास ठेवला. पण एक बाई खोटं बोलत नाही,” असं त्यांनी सांगितलं आहे.
“माझ्या बहिणीसोबतही शारिरीक हिंसाचार झाला. मला दोन खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं. 45 दिवस मी येरवाडा जेलमध्ये होते. मला कोणी भेटण्यासही आलं नाही. कोण मला काढणार याची वाट पाहत होते. बीडच्या जेलमध्ये मी 16 दिवस होता. कलेक्टर ऑफिसमध्ये मला मारहाण केली जाते.
माझ्या गालावर मारलं, चुकीच्या जागी हात लावतो आणि महाराष्ट्रातील कोणताही मुख्यमंत्री काही करत नाही. मी कधीच आत्महत्या केली असती. एकदा प्रयत्नही केला. पण मला मुलांचा चेहरा पाहण्यास सांगण्यात आलं,” अशी माहिती त्यांनी दिली आहे.
“मी ठेवलेली बाई नाही, मी धनंजय मुंडेंची पहिली पत्नी आहे. हीच माझी लढाई होती आणि आज त्याचाच विजय झाला आहे. मला भारतातील महिलांना एकच सांगायचं आहे की, समोरचा मोठा माणूस आहे,
मंत्री, पैसेवाला हे पाहून शांत बसू नका. मी लढाई सुरु केली तेव्हा एक रुपया नव्हता. घर कर्जात होतं. माझी गाडी उचलण्यात आली. आमच्याकडे घराचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नव्हते”, असंही त्या म्हणाल्या.
“माझ्या लढ्याला यश आलं आहे. कोर्टाने पहिली पत्नी म्हणून आदेश दिला आहे. बायको नसून, देखभाल खर्चासाठी दिलेला नकार यावर कोर्टाने निर्णय दिला आहे. मी कोर्टाच्या निर्णयावर समाधानी नाही. मी या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. माझी दर महिना 15 लाखांची मागणी आहे.
माझा 1 लाख 70 हजारांचा घराचा हफ्ता आहे. 7 ते 8 महिन्यापांसून हफ्ता भरलेला नाही. 30 हजारांचा मेंटेनन्स आहे. मुलगा घऱात बेरोजगार बसला आहे. 2 लाखात काय होणार?,” अशी विचारणा करुणा मुंडे यांनी केली आहे.