दिल्ली रेल्वे स्थानकात चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
18 people killed in stampede at Delhi railway station

नवी दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १८ प्रवाशांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर कुंभला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी क्षमतेपेक्षा जास्त झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हे प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांची वाट पाहत होते. १२ गंभीर जखमींवर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ९ महिला, ४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये बिहारमधील ९, दिल्लीतील ८ आणि हरियाणातील एका व्यक्तीचा समावेश आहे.
प्रयागराजला जाण्यासाठी गाडी पकडण्यासाठी रेल्वे स्थानकात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच प्लॅटफॉर्म बदलल्याची घोषणा झाली आणि गर्दी एका प्लॅटफॉर्मवरुन दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे वळली. त्यातच चेंगराचेंगरी झाली.
स्थानकावर प्रचंड गर्दी झाल्याने चेंगराचेंगरी झाली आणि त्यात अनेक प्रवाशी गुदमरल्याने बेशुद्ध झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तर, पोलिस उपायुक्त (रेल्वे) यांनी अधिकृत निवेदनात सांगितले की,
प्रयागराज एक्स्प्रेस गाडी निघण्याची वाट पाहत असताना प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वर आधीच मोठी गर्दी होती. त्यात स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस आणि भुवनेश्वर राजधानी एक्सप्रेस उशिराने धावत होत्या
आणि या गाड्यांचे प्रवासीही प्लॅटफॉर्म क्रमांक १२, १३ आणि १४ वर देखील उपस्थित होते. तेव्हा रात्री ९.५५ च्या सुमारास चेंगराचेंगरी झाली, त्यानंतर अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करावी लागली.
चेंगराचेंगरीत आई गमावलेल्या एका प्रवाशाने सांगितले की, आम्ही बिहारमधील छपरा येथे जात होतो जिथे आमचे घर आहे. आम्ही एका ग्रूपमध्ये होतो. लोक एकमेकांना ढकलत होते.
या गोंधळात आणि चेंगराचेंगरीत माझ्या आईचा मृत्यू झाला. माझ्या आईवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी माझ्या आईचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. कुटुंबातील एक महिलाही बेशुद्ध पडली.
दिल्ली अग्निशमन सेवेचे (डीएफएस) प्रमुख अतुल गर्ग यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी घटनास्थळी बचाव पथके आणि चार फायर इंजिन पाठवले आहेत.
उत्तर रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (सीपीआरओ) हिमांशू उपाध्याय यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, प्रवाशांनी एकमेकांना ढकलले, त्यामुळे काही जण जखमी झाले.
दरम्यान या अपघातात मृत पावलेल्या नागरिकांबद्दल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दुःख व्यक्त केले असून, अजून किती निष्पाप लोकांना अशा पद्धतीने मरावे लागणार आहे,
याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी द्यावे, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वेमंत्री वैष्णव यांनी राजीनामा देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे की, बुलेट ट्रेन ही जनतेची प्राथमिकता नाही. तर सुरक्षित प्रवास करण्यासाठी पुरेशा सुविधा देऊन ज्या ट्रेन आपल्याकडे आहेत, त्यातच सुधारणा करावी.
हा अपघात म्हणजे रेल्वेची अतिशय बेजबाबदार आणि सामान्य प्रवाशांबाबत असलेली गैरव्यवस्था आहे. चेंगराचेंगरीत ज्यांचा मृत्यू झाला, त्यात महिला आणि लहान मुलांचा देखील समावेश आहे. त्यांच्या नातेवाईकांना मोदी आणि रेल्वेमंत्री काय उत्तर देणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.
या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास, प्लॅटफॉर्म 14 आणि 15 वरील प्रवासी प्रयागराजला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्घटना घडली.
अचानक वाढलेल्या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी कोणतीच यंत्रणा नसल्याने ही चेंगराचेंगरी झाली असून, अनेक नागरिक जखमी आहेत. आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केलाय. 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
संजय राऊत म्हणाले की, दिल्लीला प्लॅटफॉर्म क्रमांक 14 वर जी अव्यवस्था महाकुंभच्या निमित्ताने सरकारने दाखवली, त्याचे बळी दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर झाले. सरकारी आकडा तीस आहे.
पण माझी माहिती आहे की, किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीमध्ये मरण पावले आहेत. सरकार आकडा लपवत आहे. महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिले जात आहे की जसे हा भाजपचाच सोहळा आहे.
लोकांना असे भ्रमित केले जात आहे की, तुम्ही फक्त या. तुमच्यासाठी गाड्या, जेवण, राहण्याची व्यवस्था सर्व काही होईल. मात्र, तसे काहीही नाही. इतकी अव्यवस्था कुठल्याच कुंभमध्ये झालेली नव्हती.
काल योगी म्हणत होते की, 50 कोटी लोक आलेत. मग तिथे मेले किती ते सांगा. प्रयागराजला किती लोक मरण पावलेत? सात हजारावर लोक बेपत्ता आहेत, असे त्यांनी म्हटले.
सरकार हा आकडा लपवत आहे. रेल्वेमंत्री सांगायला तयार नव्हते. पण दिल्लीतील रेल्वे प्रशासनाचा एक अधिकारी अचानक बोलला आणि हा आकडा समोर आला.
तुम्ही कुंभचा राजकीय व्यापार चालवला आहे. तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात. तुम्हाला थोडीही माणुसकी नाही. दिल्लीच्या प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी उसळल्याचे आपण पाहत आहोत.
मध्यप्रदेशमधून किंवा उत्तर प्रदेशमधून प्रचंड प्रमाणात लोक येत आहेत. तुमचं त्याच्यावर नियंत्रण नाही. लोक रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. दरवाजे तोडून लोक जात आहे. सरकार काय करत आहे? मोदीजी काय करताय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
राजन साळवी यांनी ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवरच जोरदार निशाणा साधला आहे.
फक्त दोन तासांसाठी ईडी आणि सीबीआय आमच्या हातात द्या, अमित शाह सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्ला चढवला आहे. शिंदे गटाचं कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन टायगर. उद्या सत्ता नसेल तर यांचं अख्खं दुकान खाली होईल.
मी मागेही म्हणालो होतो की, दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या, अमित शाहही आमच्या पक्षात प्रवेश करतील. दोन तास ईडी आमच्या हातात द्या, अमित शाह मातोश्रीत येऊन प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत.
ऑपरेशन टायगरचं आम्हाला काय सांगता? ईडी हातात आली की बावनकुळ्यांपासून सर्व तुम्हाला कलानगरच्या दारात दिसतील. सत्तेची मस्ती आम्हाला दाखवू नका. सत्ता आम्हीही भोगली आहे.
आम्हीही सत्तेत होतो. पण इतक्या विकृत पद्धतीने सूडबुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे.
संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील चेंगराचेंगरीवरूनही हल्ला चढवला. दिल्लीला फ्लाट फॉर्म क्रमांक 14वर कुंभच्या निमित्ताने जी अव्यवस्था सरकारने दाखवली आहे. त्याचे बळी रेल्वे स्टेशनवर झाले.
मृतांचा सरकारी आकडा ३० आहे. माझ्या माहिती प्रमाणे किमान 120 ते 150 लोक चेंगराचेंगरीत मरण पावले आहेत. हा माझा आकडा आहे. सरकार आकडा लपवत आहे.
महाकुंभला जाण्यासाठी भाजपकडून ज्या पद्धतीने निमंत्रण दिलं जात आहे, जणू हा भाजपचाच सोहळा आहे. लोकांना भ्रमित केलं जातंय. तुम्ही फक्त या, तुमच्यासाठी गाड्या, घोडे, जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था असल्याचं सांगितलं जातंय. पण प्रत्यक्षात तिथे असं काही नाही. इतकी अव्यवस्था कोणत्याच कुंभात झाली नव्हती, असं राऊत म्हणाले.
काल 50 कोटी लोक आले हे योगी सांगत होते. पण मेले किती सांगा? चेंगराचेंगरीत किती मरण पावले? 7 हजाराच्यावर लोकं बेपत्ता आहेत. कुठे गेले 7 हजार लोक. एक तर चेंगराचेंगरीत मरण पावले असतील.
दिल्लीत 100च्यावर लोक चेंगराचेंगरीत लोक मेले. मंत्री सांगत नव्हते. पण दिल्ली रेल्वेच्या अधिकाऱ्यानेच हा आकडा सांगितला. नाही तर हा आकडा कधीच बाहेर आला नसता, असंही त्यांनी सांगितलं.
तुम्ही कुंभची मार्केटिंग करत आहात. तुम्हाला माणुसकी नाही. दिल्लीत फ्लॅटफॉर्मवर चार दिवसापासून गर्दी आहे, हे तुम्हाला माहीत नाही. लोकं रेल्वेच्या खिडकीच्या काचा फोडून लोक आत जात आहे.
काय करतंय सरकार? काय करतात मोदी? राष्ट्रपती कुंभला गेले. मोदी कुंभला गेले. तुम्ही त्यांचे फोटो दाखवता. गरीब लोकं चिरडून मेले ते दाखवा ना,
असा सवाल करतानाच दिल्लीतील चेंगराचेंगरीचा 18 अधिकृत आकडा आहे. म्हणजे 108 लोक मेले. सरकारचा आकडा खोटा आहे. व्यवस्थेचं हे फेल्युअर आहे, अशी टीका त्यांनी केली.