कारागृहातुन ४ कैदी पळाले ;पोलीस घामाघूम
4 prisoners escaped from the prison; the police are sweating

अहमदनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यातून सुमारास ४ कैद्यांनी पलायन केलं आहे.
कारागृहाचे गज तोडून हे चारही कैदी फरार झाले आहेत.आज बुधवार ८ नोव्हेंबर पहाटेच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
फरार झालेल्या कैद्यांवर बलात्कार, खून, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. दरम्यान, पोलिसांनी फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात वेगवेगळी पथके रवाना केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील कारागृहात ४ कैद्यांना ठेवण्यात आलं होतं.
बुधवारी पहाटेच्या सुमारास या कैद्यांनी कारागृहाचे गज तोडून धूम ठोकली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांची झोपच उडाली.
फरार झालेल्या कैद्यांच्या शोधात पोलिसांनी वेगवेगळी पथके रवाना केली आहे. गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले आरोपी कारागृहातून फरार झालेच कसे? असा संतप्त सवाल परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.