महायुतीत नाराजीनाट्य ; मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची गैरहजेरी

Discontent in the Mahayuti; Both Deputy Chief Ministers absent from the meeting called by the Chief Minister at the Sahyadri Guest House

 

 

 

प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याचा आज समारोप होतोय. असं असताना महाराष्ट्रात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. येत्या 2027 मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा असणार आहे.

 

या कुंभमेळ्याला देशभरातील लाखो भाविक येत असतात. त्यामुळे राज्य सरकारकडून तशी तयारी देखील केली जाते. याआधी 2015-16 मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा भरवण्यात आला होता.

 

यानंतर आगामी 2027 मध्ये हा कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याची आतापासूनच सरकारकडून तयारी केली जात आहे. नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे हा कुंभमेळा भरतो.

 

या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाची बैठक बोलावली. पण या बैठकीला राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गैरहजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक बोलावण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.

 

या बैठकीला मंत्री गिरीश महाजन यांच्यासह मुख्य सचिव सुजाता सौनिक, नगरविकास आणि अर्थ विभागाचे मुख्य सचिव उपस्थित होते. यासोबत रेल्वेचे अधिकारी देखील उपस्थित होते.

 

पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही प्रमुख नेते या बैठकीला गैरहजर होते. हे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी

 

देखील यापूर्वी कुंभमेळ्याच्या तयारीसाठी बैठक घेतली होती. आता देवेंद्र फडणवीस हे बैठक घेत आहेत. पण आजच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर राहण्यामागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येत असते. राज्य मंत्रिमंडळाच्या एका बैठकीत एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष मंत्रालयात न जाता ऑनलाईन उपस्थित राहणं,

 

शिंदेंनी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या प्रकल्पांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश देण्यात येणं, या अशा घटनांमुळे एकनाथ शिंदे यांची नाराजी वाढत असल्याची चर्चा सातत्याने समोर येत आहे.

आतापर्यंत अशा अनेक घडामोडी घडून गेल्या आहेत ज्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांना उधाण येतं. नाशिक आणि रायगड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेल्या मतभेदामुळेदेखील

 

एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा सातत्याने समोर येते. या घडामोडींनंतर आता सह्याद्रीवर पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत एकनाथ शिंदे हे गैरहजर असल्याची माहिती समोर येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *