Breaking news of merger of two nationalists;संजय राऊतांचे ट्वीट,म्हणाले राज्यात भूकंपाची चाहूल?

Breaking news of merger of two nationalists;Sanjay Raut's tweet, said there was a warning of an earthquake in the state?

 

bj admission
bj admission

 

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी सकाळी एक सूचक ट्वीट करत पुन्हा एकदा चर्चेला उधाण आणले आहे. ‘

 

जय महाराष्ट्र’ असे लिहित त्यांनी एक फोटो पोस्ट केला असून, या फोटोमुळे राज्याच्या राजकारणात नवा चर्चेचा विषय उभा राहिला आहे. राज्याच्या राजकारणातील आगामी भूकंपाची चाहूल असल्याचे म्हटले जात आहे.

हे सुद्धा वाचा;Maharashtra monsoon Alert;देशभरात धो,धो पाऊस, महाराष्ट्रात मात्र मान्सूनचा चकवा

संजय राऊतांच्या ट्वीटमध्ये काय?
संजय राऊत यांनी जय महाराष्ट्र असं लिहीत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एक घड्याळ हवेत विरत असल्याचे दिसत आहे. फोटोवर एक मजकूर लिहिला आहे – “प्रत्येकाकडे वेगवेगळे घड्याळ असते.

 

तुमची वेळ येईपर्यंत प्रतीक्षा करा.” या संदेशाचा राजकीय अर्थ काढत अनेकांनी याचे विश्लेषण सुरू केले आहे.

 

सध्या राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यातील संवाद चांगलाच वाढला आहे.

हे सुद्धा वाचा;Fadnavis government’s big decision;फडणवीस सरकारचा मोठा निर्णय;राज्यातील 903 योजनाच्या प्रशासकीय मान्यता रद्द

विविध बैठकांच्या दरम्यान काका-पुतण्यात संवाद सुरू असून दुरावा आता संपू लागल्याचे म्हटले जात आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी एकत्र आल्यास आश्चर्य वाटू नये.

 

मात्र, आपण या सगळ्यापासून दूर असून सुप्रिया आणि इतर नेत्यांनी निर्णय घ्यावा असे वक्तव्य शरद पवार काही दिवसांपूर्वी केले होते. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले.

 

‘घड्याळ’ हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह असल्याने, राऊत यांच्या पोस्टमधील हे प्रतीक अनेक शक्यता उभ्या करत आहे.

हे सुद्धा वाचा;Petrol-Diesel Rate News;देशात जनतेकडून 1 लीटर पेट्रोल-डिझेलवर सरकार किती कमवते

संजय राऊत यांनी राष्ट्रवादी पवार गटाच्या काही नेत्यांवर टीका करताना भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेला विरोध केला. राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाल्यास आणि तो पक्ष सत्तेत गेल्यास राज्यातील महाविकास आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *