महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित ;संजय राऊत
Seat allocation of Mahavikas Aghadi confirmed; Sanjay Raut
लोकसभा निवडणुकीचे जागावाटप ३१ डिसेंबरच्या आत करावे, असा निर्णय ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत झाला असतानाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र परिवर्तनाला सज्ज असून, आमचे सगळे ठरले आहे असे सांगितले.
काँग्रेसने जागावाटप सामोपचाराने होईल, अशी ग्वाही दिली आहे. तर, ‘जिंकेल त्याला उमेदवारी’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितलेले सूत्र आहे.
जागावाटप जवळपास निश्चित झाले आहे, असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात निश्चित आकडे अद्याप स्पष्ट केले जात नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाने २3 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या पक्षाने तशी तयारीही सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेने लढविलेल्या जागांपेक्षा एकाही जागेचा आग्रह सोडणे अयोग्य होते.
मात्र, ‘इंडिया’ आघाडीचा मार्ग सुकर होण्यासाठी शिवसेना त्याग करण्याचे मान्य करत आकड्यांवर विचार करण्यास तयार असल्याचे एका ज्येष्ठ नेत्याने नमूद केले.
महाराष्ट्रात काँग्रेसची कामगिरी सुधारायची गरज असल्याचे पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे मत आहे. त्यासाठी त्यांना निरीक्षकपदी नवा नेता नेमायचा आहे.
यामध्ये रमेश चेन्निथला यांचे नाव आघाडीवर आहे. के. सी. वेणुगोपाल या राहुल गांधी यांच्या विश्वासू सहकाऱ्याने होकार दिल्यास ही घोषणा लगेच केली जाईल, असे समजते.
काँग्रेसला गेल्या निवडणुकीत जेमतेम एक जागा जिंकता आली होती. चंद्रपुरात अनपेक्षित विजय मिळविणाऱ्या सुरेश (बाळू) धानोरकर यांचे खासदार असतानाच निधन झाले.
त्यामुळे आज काँग्रेसचा एकही खासदार नाही. त्यांना ज्या जागा मिळतील, तो बोनस असल्याचे बोलले जाते. काँग्रेसने हा आकडा अमान्य करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगली आहे. आम्ही एकसंध आहोत.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनंतर फरक पडला आहे, असे पक्षाच्या दिल्लीकर नेत्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले आहे. परिस्थिती लक्षात घेत नव्याने जागावाटप होईल, असे काँग्रेसचे ठाम मत आहे.
मात्र, भाजपला महाराष्ट्रात रोखणे आवश्यक असल्याने कोणताही वाद होणार नाही. महाविकास आघाडी एकसंधपणे निवडणूक लढवेल, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
आगामी लोकसभा निवडणूकीसाठी राजकीय पक्षांच्या हलचालींना सध्या वेग आला आहे. यादरम्यान लोकसभा निवडणूकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.
महाराष्ट्रात आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष 23 जागा लढवेल. आम्ही याबाबत दिल्लीतील काँग्रेस हायकमांडसोबत त्याबद्दल चर्चा होईल असे संजय राऊत म्हणाले आहेत.
माध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत जागावाटपाच्या मुद्द्यावर बोलताना म्हणाले की, काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा लढवाव्यात. गुरूवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली.
हे महाराष्ट्रातील नेत्यांना माहिती नसेल. तसेच, उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यावर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली. त्या चर्चेत काय घडलं, हे आम्हाला माहिती आहे.
महाराष्ट्रातील जागा वाटपाची चर्चा महाराष्ट्रात होणार नसून ती दिल्लीत हायकमांडसमोर होईल, आम्ही २३ जागा लढवतोय हे आम्ही दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांना सांगितलं आहे. आमचे संबंध दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांसोबत अत्यंत मधूर आहेत.
प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतची आमची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे, ते महाविकास आघाडीचा भाग असावेत याविषयी आमची दिल्लीत चर्चा झाली आहे, आम्ही २३ जागा लढवणार, असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्यावर संजय राऊतांचा दावा खोडला आहे. वडेट्टीवार म्हणाले की, कोण किती जागा लढणार हा वादाचा मुद्दा होऊ शकत नाही. ज्यांची जिथे शक्ती जास्त आहे, मेरीटवर आम्ही जागा लढवू. हा निर्णय हायकमांड घेईल.
हा राज्य स्तरावरचा निर्णय नाही. हा केंद्रीय स्तरावरचा विषय आहे. अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी हे यासंबंधीचा निर्णय घेतात.अजून प्राथमिक चर्चेची फेरीही झाली नाही मग जागा वाटपाच्या संख्येचा प्रश्न आला कुठे असे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.