थंडीचा कडाका वाढल्याने जनजीवन विस्कळीत

Due to the increase in severity of cold, life is disrupted ​

 

 

 

 

राज्यासह देशात थंडीचा कडाका वाढला आहे. एकीकडे दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा जोर पाहायला मिळत असून उत्तर भारतात थंडीची लाट पसरली आहे.

 

 

मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील तापमानातही कमालीची घट झाली आहे. राज्यात सध्या थंडीचा कडाका वाढल्याने लोक शेकोटीचा आधार घेत आहे.

 

 

पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 25 डिसेंबर दरम्यान तापमानात किंचित वाढ होईल त्यानंतर डिसेंबरच्या शेवटच्या काही दिवसांत पुन्हा थंडीची लाट पाहायला मिळणार आहे.

 

 

राज्यात आठवडाभर कोरडं वातावरण राहणार असून हवेत कमालीचा गारवा जाणवेल. जळगाव जिल्ह्यात सध्या थंडीची लाट सुरू आहे. जळगावमध्ये तापमान 10 अंशापर्यंत खाली घसरलं आहे.

 

 

थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकांनी उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळपासूनच गुळाचा चहा,

 

 

मिरची भजे आणि झणझणीत मिसळ खाण्यासाठी जळगावकरांनी गर्दी केल्याचं चित्र जळगावमध्ये अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे.

 

 

पंढरपुरात दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री कडाक्याची थंडी पडू लागल्याने नागरिक मोठ्या संख्येने आजारी पडू लागले आहेत.

 

 

गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनंतर आता नाशिकच्या येवला शहरासह परिसरात थंडी आणि दाट धुक्याची चादर पसरली आहे.

 

 

 

दाट धुक्यामुळे परिसरातील शेत तसेच रस्ते देखील दिसून येत नसल्याचे चित्र होते. ‘मॉर्निंग वॉक’ ला जाणाऱ्या येवलेकरांनी या गुलाबी थंडीसह दाट धूक्याच्या चादरीचा मनमुराद आनंद घेतला. दरम्यान, या धुक्याचा परिणाम शेतीपिकांवर होणार असून गारपिटीमूळे वाचलेल्या पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे.

 

 

परभणी ,नांदेड,जालना ,हिंगोली जिल्ह्यामध्ये वातावरणात मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण प्रचंड थंडी त्याचबरोबर धुक्याची दाट पसरलेली चादर यामुळे वातावरणात पूर्णपणे बदल झाल्याचे पाहायला मिळते.

 

 

धुके इतके दाट प्रमाणात होते की, अगदी 200 मीटर पर्यंतही दिसत नव्हतं. दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे, त्यामुळे याचा फटका सकाळी शहरात येणारे दूधवाले, शाळकरी मुले, यासह भाजीपाला विक्रीसाठी घेऊन येणारे शेतकरी यांना बसतोय.

 

 

 

नववर्षापूर्वी शुक्रवारपासून देशाच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे ढगाळ वातावरणासह अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

काश्मीर खोऱ्यात सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात वेगाने थंड वारे वाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, थंड वाऱ्यांचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. परिणामी उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

 

 

 

दरम्यान, 23 ते 24 डिसेंबर या कालावधीत किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून बहुतांश राज्यातील भागात हवामान कोरडं राहील.

 

 

येत्या काही दिवसांत काही भागात सकाळी धुके पडण्याची शक्यता आहे. 25 ते 26 डिसेंबरदरम्यान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता असून त्यानंतर तापमानात पुन्हा घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

 

 

 

राजस्थान हवामान विभागाच्या मते, नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे, काही ठिकाणी हलका पाऊस ते मध्यम स्वरुपाचा रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

उर्वरित बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता फारच कमी आहे. 23 डिसेंबरपासून पुढील एका आठवड्यात देशातील बहुतांश भागात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे.

 

 

हवामान खात्याने तामिळनाडूच्या चार जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तामिळनाडूमध्ये पूरस्थिती कायम आहे. तसेच, राजस्थानमध्येही आज पावसाची शक्यता आहे.

 

 

 

पुढील 24 तासांत जम्मू-काश्मीर, लडाख, आणि हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 

तसेच, आयएमडीच्या अंदाजानुसार, 23 आणि 24 डिसेंबर रोजी उत्तराखंडच्या अनेक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि त्रिपुरामध्ये आज दाट धुके पडेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

 

 

 

उत्तर भारतात थंडीची लाट पाहायला मिळत आहे. मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील पाराही घसरला आहे. महाराष्ट्रासह उत्तर भारतात पारा कमालीचा घसरला आहे.

 

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसर, गेल्या 24 तासांत पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर राजस्थानच्या बहुतांश भागात किमान तापमान 4-8 अंश सेल्सिअस होते

 

 

आणि बहुतेक उत्तर प्रदेश, दक्षिण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंडमध्ये होते. आणि अंतर्गत ओडिशा. काही भागांमध्ये ते 8-12 अंश सेल्सिअस दरम्यान पाहायला मिळालं.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *