BREAKING NEWS;हिंगोली जिल्ह्यातील 3 तालुक्यातील काही गावात भूगर्भातून आवाज जनता भयभीत

In some villages of the 3 taluka of Hingoli district, people are afraid of noise from underground

 

 

 

जिल्ह्यात वसमत, औंढा व कळमनुरी तालुक्यातील काही गावांत बुधवार मध्यरात्री १२.४ वाजता भूगर्भातून आवाज आल्याने जमीन हादरली.

 

 

 

मात्र यामुळे कोणतीही हानी झाली नाही. याची कोणतीही नोंद झाली नाही. हा सौम्य धक्का असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या वतीने सांगण्यात आले.

 

 

 

वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, खांबाळा, सिरळी व कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, पोतरा, सिंदगी, असोला तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील पिंंपळदरी या पट्ट्यात

 

 

 

असलेल्या गावात बुधवारी मध्यरात्री १२.०४ वाजता भूगर्भातून आवाज झालि. यामुळे या गावातील गावकरी रस्त्यावर आले गावात कोठे काही झाले का याची माहिती घेत होते.

 

 

 

या आवाजाने कोणतेही नुकसान झाले नसल्याचे गावकरी भागवत शिंदे, गणेश खंडागळे यांनी सांगितले. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावात मागच्या अनेक वर्षांपासून जमिनीतून गूढ आवाज येत आहेत.

 

 

 

आतापर्यंत दोनशे वेळा आवाज आले आहेत. दोन ते तीन वेळा या गावात आवाज आल्याने त्याची नोंद रिश्टर स्केलवर झाली होती. ते भूकंपाचे धक्के होते.

 

 

 

 

त्यांनतर परत भूगर्भातून आवाज येण्याची मालिका सुरुच आहे. बुधवारी रात्री एक वेळा पांगरा शिंदे व या गावाच्या पट्ट्यात येणाऱ्या गावात भूगर्भातून आवाज आले.सतत होणाऱ्या आवाजाने गावकऱ्यांत भिती निर्माण झाली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *