शरद पवार-प्रकाश आंबेडकरांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण

Sharad Pawar-Prakash Ambedkar meeting? Discussion in political circles

 

 

 

 

राज्याच्या राजकारणातून मोठं वृत्त समोर आलं आहे. पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं वृत्त हाती आलं आहे.

 

 

राज्यातील दोन्ही महत्वाच्या नेत्यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरु झालं आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या भेटीचा इन्कार केला आहे.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

 

 

पुण्यात मोदी बागेत प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार यांची भेट घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बड्या नेत्यांची भेट झाल्याची शक्यता आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी या भेटीचा इन्कार केला आहे.

 

 

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर झाल्याची माहिती समोर आली आहे. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या भेटीचा दावा प्रकाश आंबेडकरांनी फेटाळला आहे.

 

 

मोदी बागेत नातेवाईकांची भेट घेतल्याची स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकरांनी दिलं आहे. या कथित भेटीनंतर राजकीय वर्तुळात आगामी लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाली असावी, असं तर्कवितर्क लावले जात आहेत.

 

 

 

पुण्यातील मोदी बागेत शरद पवार राहतात, त्याच इमारतीत प्रकाश आंबेडकर यांचे नातेवाईक राहतात. प्रकाश आंबेडकर यांच्या दोन बहिणी मोदी बागेतील इमारतीत राहतात.

 

 

त्यांना भेटण्यासाठी गेलो असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर माझं नेहमी येणं-जाणं असतं, असंही ते म्हणाले.

 

 

तत्पूर्वी, शरद पवारही आज घरी आहेत. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. दोन्ही नेत्यांची भेट झाली का, हे लवकरच स्पष्ट होईल.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *