पहा VIDEO; ड्रायव्हरने लावला ब्रेक अन् मंत्री महोदय टपावरुन थेट आपटले …

Watch the VIDEO; The driver applied the brake and hit the minister directly.

 

 

 

 

तेलंगणात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असून प्रचार सभा, पदयात्रा, वाहनांवरुन जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवारांची धडपड सुरु आहे.

 

 

 

पण अशाच एका प्रचार सभेदरम्यान, बीआरएसच्या नेत्याचा अपघात झाला.यामध्ये त्यांना गंभीर दुखापत झालेली नसली तरी याचा धडकी भरवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

 

 

 

.
तेलंगाणाचे मंत्री आणि बीआरएस नेते केटीआर राव हे एका टेम्पो ट्रॅव्हलर बसच्या टपावर उभा राहून प्रचार रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत आणखी पाच-सहा कार्यकर्ते होते. अत्यंत छोट्या जागेत रेलिंगच्यामध्ये ते उभे होते.

 

 

 

बस सुरु असताना अचानक ड्रायव्हरनं करकचून ब्रेक दाबला. यामुळं टपावर उभे असलेल्या लोकांच्या वजनामुळं रेलिंग तुटलं आणि सर्वजण खाली कोसळले. यामध्ये मंत्री केटीआर राव हे देखील होते.

 

 

 

निझामाबाद जिल्ह्यातील अरमूर इथं निवडणूक प्रचारादरम्यान ही दुर्घटना घडली. अचानक ही घटना घडल्यानं मंत्री महोदय थेट बसच्या टपावरुन

 

 

 

खाली जमिनीवर पडल्यानं त्यांना मार लागल्याचं सांगितलं जात आहे. पण नेमकी कशी दुखापत झाली याची सविस्तर माहिती कळू शकलेली नाही.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *