बाल विद्यामंदिर शाळेचे शिक्षक विजय कुलकर्णी यांचे निधन
Bal Vidyamandir school teacher Vijay Kulkarni passed away

परभणी – बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे निवृत्त शिक्षक पू.विजय कुलकर्णी यांचे हृदय विकाराच्या तिव्र धक्याने दि.01फेब्रुवारी,रोजी सकाळी झोपेतच दुःखद निधन झाले .
जो आवडे सर्वाला तोच आवडे देवाला.प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे , मदत करणारे म्हणून सर ओळखले जायचे .आवर्जून चौकशी करणे ,
वेळेत काम पूर्ण करणे , सर्वांना सांभाळून घेऊन चालणे , हा त्यांचा स्वभाव होता .विद्यार्थी प्रिय शिक्षक , समाज प्रिय माणूस , शुन्यातून विश्व निर्माण केले .
त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती जपे मॅडम यांनी भक्कम साथ दिली .त्यांच्या पश्चाता दोन मुले , सूना , नातवंडे असा मोठा परिवार आहे.मोठा मुलगा चि.विशाल हा अमेरिकेत
तर लहाना चि.वैभव पुणे शहरात वास्तव्यास आहे.त्यांच्या निधनाची दुःखद बातमी जगभर पसरली आणि कुलकर्णी परिवार , जपे परिवार , विद्यार्थी वर्ग शोकसागरात बुडाला.
पू शिवणकर सरांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाची प्रमुख जवाबदारी सर सांभाळत होते .कानांवर विश्वास बसणार नाही , अशीच ही बातमी होती .
प्राथमिक विभागात ईयत्ता पहिली पासून शिक्षक म्हणून 1971 ला सेवेत रुजू झालेल्या सरांनी दोन विषायात पदवीव्युत्तर पदवी संपादन करुन उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून सेवा केली
आणि कला शाखेचा 100%निकाल लावून कनिष्ठ महाविद्यालयला बहुमान मिळवून दिला.अजातशत्रु व्यक्तीमत्व असलेले सर विद्यार्थी प्रिय होते .
दररोज विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अभ्यासाची चौकशी करुन मार्गदर्शन करणारे सर पंचतत्वात विलिन झाले ही गोष्टच मुळी अविश्वसनीय आहे.हजारो प्रतिक्रिया वाचून सरांच्या माणूसकीची उंची किती होती याची कल्पना येते .
बाल विद्यामंदिर शिक्षण संस्थेच्या आमसभेच्या मंडळाचे ते सदस्य होते .चंतुरंग प्रतिष्ठान चे स्थापने पासून सदस्य होते . बाल विद्यामंदिर कर्मचारी पतसंस्थेचे पाच वर्ष चेअरमन होते .
शाळेच्या ईमारत बांधकामातही सरांनी मोलाचे सहकार्य केले .बहुआयामी व्यक्तीमत्व असलेल्या सरांनी अशी “एक्झीट” घेतली की मन बधीर झाले , सून्न झाले .
दिल्लीहून ताबडतोब सरांच्या दर्शनासाठी विमानानं आलेल्या पोर्णिमा कागवटेनी श्रद्धांजली अर्पण करतांना व्यक्त केलेल्या भावनांनी वैकूंठभूमित आलेला प्रत्येक जण अश्रूंच्या धारांनी न्हावून निघाला .
तुमच्या सारखे तुम्हीच दुसरे व्हिजी होणे नाही .दि.11फेब्रुवारी सकाळी 11-00 वा.श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर , विद्यानगर परभणी येथे सरांच्या कर्तुत्वाला
आदरांजली अर्पण करणार आहोत .सरांच्या कर्तुत्वाला सलाम करण्यासाठी त्यांच्याप्रति नितांत आदर असणाऱ्यांनी उपस्थित रहावे .वेळेवर यावे.