उद्यापासून धावणार हिंगोली -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस वसमत ला थांबा ;जनतेत आनंद

Hingoli-Mumbai Janshatabdi Express to run from tomorrow stops at Vasmat; people rejoice

रफिक शेख /मराठवाडा प्रतिनिधी

Blog Entry#: 5987494-0
12071/Mumbai CSMT   HNL/Hingoli Deccan
गाड़ी क्रमांक 12071/72 मुंबई- जालना -मुंबई जनशताब्दी एक्सप्रेस का महाराष्ट्र के...

गाडी क्रमांक 12072/12071 जालना – मुंबई सीएसएमटी – जालना जनशताब्दी एक्सप्रेसचा हिंगोली (डेक्कन) पर्यंत विस्तार करण्याचे रेल्वे बोर्डाने मंजूर केले आहे.

या नुसार ही गाडी दिनांक रविवारी 10 मार्चपासून हिंगोली -मुंबई सीएसएमटी – हिंगोली अशी नियमित वेळा पत्रकानुसार धावेल.

केंद्रीय रेल्वे, कोळसा आणि खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन हिंगोली रेल्वे स्थानकावरून

उद्या शनिवारी (दि.9) दुपारी 3 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास हिंगोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनाची विशेष गाडी क्रमांक 02072 शनिवारी (दि.9) हिंगोली येथून दुपारी 4 वाजता सुटेल आणि वसमत, पूर्णा, परभणीमार्गे जालना येथे रात्री 8 वाजता पोहोचेल.

मुंबईला जाण्यासाठी वासमत वासीयांना या रेल्वेचा मोठा फायदा होणार आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणात रेल्वे धावतात

परंतु वसमत स्थानकावर काही मोजक्याच रेल्वे थांबत असल्याने वसमतचे रेल्वेस्थानक शोभेचे झाले असल्याची भावना तालुकावासीयांची झाली आहे,

परंतु जनशताब्धी एक्सप्रेसला वसमत स्थानकावर थांबा मिळाल्याने मुंबईला जाणाऱ्या प्रवाश्याना याच मोठा फायदा होणार असल्याने जनतेत आनंद व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *