‘या’ चार राज्यात होणार लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका
Assembly elections will be held along with the Lok Sabha in these four states
मागील बऱ्याच दिवसांपासून वाट पाहिली जात होती त्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात येणार आहेत.
यासाठी निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या दोन्ही निवडणूक आयुक्तांची मुख्य निवडणूक आयुक्तांनी ओळख करून दिली.
मुख्य निवडणूक आयुक्त यांनी यावेळी माहिती देताना २०२४ हे जगभरात निवडणुकांचं वर्ष असल्याची सांगितलं. यासोबतच १६ जून २०२४ रोजी लोकसभेचा कार्यकाळ संपत आहेत
त्यामुळे देशभरात लोकसभेच्या निवडणुका होतील, मात्र यासोबतच देशातील आंध्र प्रदेश, ओडिसा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि जम्मू काश्मीर येथे विधानसभा निवडणुका होणार असल्याची माहिती दिली.
या राज्यांमधील विधानसभेचा कार्यकाळ जून २०२४ मध्ये संपणार आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये देखील निवडणुका होणार असल्याची यावेळी त्यांनी जाहीर केलं
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितलं की, टेक्नॉलॉजी, मनुष्यबळ यात आम्ही परिपूर्ण आहोत. तसेच
आगामी लोकसभा निवडणुकीत १८ ते १९ या वयातील १.८ कोटी तरुण मतदार असणार आहेत. हे मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.
८२ लाख मतदार हे ८५ पेक्षा जास्त वयाचे आहेत तर ४८ हजार तृतीयपंथीय लोकसभा निवडणुकीत मतदान करणार आहेत.