अजितदादाच्या राष्ट्रवादीला हादरा ;मोठ्या नेत्याचा राजीनामा

Shock to Ajit Dada's NCP; Big Leader's Resignation

 

 

 

 

 

अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे.

 

 

सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे”

 

 

 

 

असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.

 

 

 

 

दरम्यान अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील.

 

 

 

 

बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात होते. पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये

 

 

 

बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते.

 

 

 

 

मात्र आता महायुतीमधील सगळी चित्रं बदलल्याचं दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

 

पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे हे कुठेतरी नाराज होते.

 

 

आणि त्यांची हीच नाराजी पक्षबदलासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. अखेरीस ते अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

 

 

 

 

शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांनी लोकसभेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली होती. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांचा पराभव झाला.

 

 

 

 

बजरंग सोनवणे यांनी बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिले.येडेश्वरी शुगर या खासगी साखर कारखान्याचे ते चेअरमन व कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत.

 

 

 

केज विधानसभा मतदार सघात बजरंग सोनवणे यांचा स्वतःचा एक वेगळा गट आहे.बजरंग सोनवणे हे बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष होते.

 

 

 

 

बजरंग सोनवणे यांच्या कन्या डॉक्टर हर्षदा सोनवणे यांचा केज नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला, तो जिव्हारी लागला.

 

 

 

 

आज बजरंग सोनवणे यांचा पक्ष प्रवेश होईल. ज्योती मेटे यांनी शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. त्या आज शासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत.

 

 

 

 

आज त्यांचा पण पक्ष प्रवेश होऊ शकतो. पक्ष ज्या जागा लढवणार आहे त्याचा सगळा आढावा शरद पवारांनी घेतला आहे, अशी प्रतिक्रिया प्रशांत जगताप यांनी दिली.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *