शिवसेना आमदाराने भाजपच्या मंत्र्याला सुनावले

The Shiv Sena MLA questioned the BJP minister

 

 

 

 

 

नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत सुरु असलेल्या वादात आता भाजपची एन्ट्री होतांना पाहायला मिळत आहे.

 

 

नाशिक भाजपचा बालेकिल्ला असून, नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे असल्याचा दावा करणाऱ्या गिरीश महाजन

 

 

 

यांच्यावर संजय शिरसाट यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. संकटमोचकांनी शेपटीला चिंधी बांधून महायुतीत व्यत्यय आणू नयेत, असे शिरसाट म्हणाले आहेत.

 

 

 

गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने नाशिकच्या जागेवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडतांना पाहायला मिळत आहे. नाशिक भाजपचा बालेकिल्ला आहे.

 

 

 

नाशिकमध्ये तीन आमदार आणि जवळपास 70 नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे नाशिक हा भाजपचाच बालेकिल्ला आहे असं गिरीश महाजनांनी म्हटलंय.

 

 

 

 

तर, ते संकटमोचक आहेत, त्यांनी शेपटीला चिंधी लावून महायुतीत व्यत्यय आणू नये असा टोला संजय शिरसाटांनी लगावला आहे. तसेच, जे रामराज्य सुरू आहे ते सुरू राहू द्या असेही शिरसाट म्हणाले आहेत.

 

 

 

मागील काही दिवसांपासून नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. शिंदे गटासह अजित पवार गटाकडून या जागेवर दावा केला जात आहे.

 

 

 

 

शिंदे गटाकडून हेमंत गोडसे इच्छुक आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळांच्या नावाची चर्चा आहे.

 

 

 

दोन्ही पक्ष एकाचवेळी या जागेवर दावा करत असून, कोणीच माघार घेण्यासाठी तयार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नाशिकचा तिढा काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.

 

 

 

काल रात्री 3 वाजेपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक सुरु असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, यावर बोलतांना शिरसाट म्हणाले की,

 

 

 

“काल फक्त उमेदवार हा विषय नव्हता, प्रचार कसा करायचा हा पण विषय झाला. उमेदवार फायनल झाल्यावर वेळ राहणार नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवसापर्यंची सगळी यंत्रणा कशी असेल यावर चर्चा झाली असल्याचे शिरसाट म्हणाले.

 

 

 

 

याचवेळी शिरसाट यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील टीका केली, “तो संजय राऊत आहे. त्याला आधी शरद पवार यांना पंतप्रधान करायचे होते.

 

 

 

 

मध्यंतरी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले. मग त्यांना ती चूक कळली. आता तो राहूल गांधीच्या गळ्यात गळा घालतो. त्यामुळे त्याचा प्रवास बघा कुठून कुठे चालला आहे, असे शिरसाट म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *