राहुल गांधी म्हणाले पंतप्रधान मोदींकडून लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न..
Rahul Gandhi said PM Modi's attempt at match fixing in Lok Sabha elections..

दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीकडून महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी पक्षांमधील नेत्यांकडून सत्ताधारी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला बोल करण्यात आला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीकडून या महारॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप राहुल गांधींनी केला. राहुल गांधी म्हणाले की, सध्या आयपीएलचे सामने सुरू आहेत.
जेव्हा बेईमानीने अंपायर वर दबाव टाकून, खेळाडूंना विकत घेऊन किंवा कर्णधाराला घाबरवून मॅच जिंकल्या जातात तेव्हा क्रिकेटमध्ये याला मॅच फिक्सिंग म्हटले जाते. आपल्या समोर लोकसभेच्या निवडणुका आहे.
अंपायर कोणी निवडले, नरेंद्र मोदी यांनी… मॅच सुरू होण्यापूर्वीच आमच्या संघातील दोन खेळाडूंना अटक करण्यात आली… त्यामुळे
या निवडणुकीत नरेंद्र मोदी मॅच फिक्सिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांची ४०० जागा जिंकण्याची घोषणा केली.. पण ईव्हीएम, मॅच फिक्सिंग, प्रेसवर दबाव टाकूनही यांचा आकडा १८० च्या पुढे जाणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
देशात काँग्रेस सर्वात मोठा विरोधीपक्ष आहे. आमचे सर्व बँक खाते बंद करण्यात आले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर सर्वात मोठ्या विरोधीपक्षाचे सर्वच बँक अकाउंट बंद करण्यात आले आहेत.
आम्हाला प्रचार मोहीम सुरू करायाची आहे. पोस्टर लावायचे आहेत. आमचे सर्व स्त्रोत बंद करण्यात आलेत. मग ही कशी निवडणूक होत आहे? असा सवाल देखील राहुल गांधी यांनी उपस्थित केला.
नेत्यांना धमकावले जात आहे, पैसे देऊन सरकारे पाडली जात आहेत. नेत्यांना जेलमध्ये टाकले जात आहे. अरविंद केजरीवाल, सोरेन यांना तुरुंगात टाकले आहे.
ही मॅच फिक्सिंग केली जात आहे. हे फक्त मोदी करत नाहीयेत, तर त्यांच्यासोबत देशातील ३-४ अब्जाधीश देखील आहेत. या मॅच फिक्सिंगचं एकच लक्ष आहे, यामधून देशाचं संविधान गरीबांच्या हातातून हिसकावून घेण्याचा डाव आहे.
ज्या दिवशी हे संविधान संपेल त्या दिवशी हा हिंदुस्तान वाचणार नाही. हा पोलीस किंवा धमक्या वापरून चालवले जाऊ शकत नाही,
असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. संविधान संपेल त्या दिवशी देश देखील वाचणार नाही, वेगवेगळी राज्य होऊन जातील देश वाचणार नाही असेही राहुल गांधी म्हणाले.