छगन भुजबळांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करा;मोठ्या नेत्याने केली मागणी
Remove Chhagan Bhujbal from the post of minister; the elder leader demanded
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील धाईत नगर येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली. या सभेत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर जोरदार हल्लाबोल केला.
मनोज जरांगे यांच्यावर भुजबळ यांनी टीकास्त्र सोडलं. ओबीसी समाजाचं आरक्षण वाचवण्यासाठी एकत्र आलं पाहिजे, अशी भूमिका भुजबळ यांनी माडंली.
भुजबळ यांच्या जालन्यातील आक्रमक भाषणाचे राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्वीट करुन छगन भुजबळ यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे.
तर, मनोज जरांगे यांनी देखील राजकीय नेत्यांनी कितीही वक्तव्य केली तरी मराठा आणि ओबीसी समजात संघर्ष निर्माण होणार नाहीस असं म्हटलं.
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
सरकारमधील एक मंत्री उघडपणे वेगळी भूमिका घेऊन जातीय तेढ निर्माण करत असेल तर सरकारची देखील हीच भूमिका आहे का ?
हे स्पष्ट करावे अन्यथा छगन भुजबळ यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी,अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
छगन भुजबळ हे राज्याचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे काम करत आहेत. सर्वसामान्य ओबीसी बांधवांचा मराठा समाजास कोणताही विरोध नसताना केवळ आपले राजकीय स्थान टिकवण्यासाठी दोन समाजांत नसलेली भांडणं लावण्याचं पाप करत आहेत.
राजकीय नेत्यांनी कितीही प्रयत्न केला तरी मराठा आणि ओबीसी यामध्ये कोणत्याही प्रकारचा संघर्ष निर्माण होणार नाही. मात्र छगन भुजबळ हे वादग्रस्त वक्तव्य करून राज्यात दंगली पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांच्या षडयंत्र यशस्वी होणार नाही, असं वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
सांगली येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत जरांगे पाटील हे बोलत होते. छगन भुजबळ हे माझ्यावर वैयक्तिक टीका करत असून ते खालच्या पातळीवरच राजकारण करत आहेत.
माझ्यावर टीका करण्या अगोदर तुम्ही पैसे खावून, जेल भोगून आला आहात याची आठवण तुम्हाला असू दे, असा टोलाही जरांगे पाटील यांनी लगावला. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही,
त्यामुळे मराठा बांधवांनी सुध्दा १ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक गावात साखळी उपोषण करावे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.