धनगर आरक्षणाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
Dhangar Reservation Petition Rejected by Supreme Court

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मराठा,ओबीसी समाजात आरक्षणाच्या मुद्द्यांवरून संघर्षाची ठिणगी पडली आहे.आंदोलने, मोर्चे, सभा, मेळावे,
बैठका यांनी वातावरण ढवळून निघालं होतं. आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडत सरकारला आव्हानही दिले जात आहे. यामुळे शिंदे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे.
याचदरम्यान, धनगर समाजाकडूनदेखील अनुसूचित जाती प्रवर्गाचे आरक्षण मिळावे, यासाठी ठिकठिकाणी आंदोलन आणि
मोर्चे काढत आक्रमक पवित्रा घेतला होता. पण आता सुप्रीम कोर्टाने धनगर समाजाच्या आरक्षणासंबंधीची याचिका फेटाळली आहे.
धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गासोबत नोकरी आणि शिक्षणात आरक्षण द्या, अशी मागणी करत चार विविध याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
या याचिकांवर मुंबई हायकोर्टात फेब्रुवारी महिन्यात सुनावणी पार पडली होती. हायकोर्टाने राज्यातील एस. टी.आरक्षणापासून प्रवर्गातून आरक्षण देण्यास स्पष्ट नकार दर्शवला होता.