वर्ल्ड कप फायनलसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल

There will be a big change in the Indian team for the World Cup final

 

 

 

 

वर्ल्ड कपची फायनल आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. क्रिकेट विश्वाासाठी हा सर्वात महत्वाचा सामना असेल. त्यामुळे या सामन्यासाठी भारतीय सज्ज झाला आहे. पण या फायनलासाठी आता भारतीय संघात एक मोठा बदल होणार असल्याचे समोर आले आहे.

 

 

भाारतीय संघाने या वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. पण सेमी फायनलमध्ये भारताला न्यूझीलंडने कडवी झुंज दिली होती. कारण या सामन्यात मोहम्मद शमी वगळता एकाही खेळाडूला चांगली गोलंदाजी करता आली नव्हती.

 

 

 

शमी हा भारतासाठी खरा नायक ठरला होता. त्यामुळे अशी अवस्था फायनलमध्ये होऊ नये, याची काळजी आता भारतीय संघाने घेतली आहे.

 

 

भारतीय संघात हा जो एकमेव बदल होऊ शकतो, त्यासाठी खेळपट्टी सर्वात महत्वाचे असल्याचे म्हटले जात आहे. कारण फानलसाठी जी खेळपट्टी बनवण्यात आली आहे ती संथ होत जाणारी आहे.

 

 

 

त्यामुळे भारताची जर दुसरी गोलंदाजी असेल तर वेगवान गोलंदाजांना जास्त मदत मिळणार नाही. पण जर दुसरी फलंदाजी असेल तर संघात जास्त फलंदाज असायला हवेत.

 

 

त्यामुळे भारतीय संघात असा एकमेव खेळाडू आहे की जो ही सर्व कसर भरून काढू शकतो. दुसरीकडे मोहम्मद सिराज हा सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. सिराजला सेमी फायनलमध्ये चांगली गोलंदाजी करता आली नव्हती आणि तो चांगलाच महागडा ठरला होता.

 

 

 

त्यामुळे फायनलसाठी सिराजला सघाबाहेर केले जाईल आणि सिराजच्या जागी भारतीय संघात अष्टपैलू आर. अश्विनला संधी दिली जाईल, असे समीकरण आता समोर येत आहे.

 

 

 

कारण अश्विनकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव आहे. त्याचबरोबर सिराज फलंदाजी चांगली करू शकत नाही पण अश्विन मात्र दमदार फलंदाजी करतो, त्यामुळे सिराजच्या जागी फायनलमध्ये अश्विन हा भारतीय संघात दिसू शकतो.

 

 

 

भारतीय संघात आता फायनलसाठी हा एकमेव बदल होऊ शकतो, असे समोर येत आहे. साधारणपणे जो संघ जिंकत असतो तो संघात बदल करताना दिसत नाही. पण फायनलसाठी मात्र हा एक बदल केला तर तो भारताच्या पथ्यावर पडू शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *