चार ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आता होणार गुन्हा दाखल;काय आहे नियम जाणून घ्या?

Candidacy form filled in four places, now a case will be filed; know what is the rule?

 

 

 

 

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्याच दिवशी उमेदवारी अर्ज भरणारे व्यंकटेश्वरा महास्वामी यांना चमकोगिरी अंगलट येण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

महास्वामी यांनी सोलापूरसह चार ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल आहेत. उमेदवारी अर्ज भरताना ही माहिती लपवल्याने व्यंकटेश्वरा महास्वामी

 

 

 

यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, असे सोलापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले.

 

 

 

 

चडचण येथील रहिवासी असलेले दीपक ऊर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी अर्ज घेऊन भरला होता.

 

 

 

 

पहिल्याच दिवशी अर्ज भरल्याने महास्वामी यांची सगळीकडे चर्चा झाली होती. मात्र, त्यांनी चार ठिकाणाहून अर्ज भरल्याचे दिसून येते, ही गोष्ट त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

 

 

 

व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी चार ठिकाणहून अर्ज दाखल केले होते. त्यात सोलापूर, विजयपूर, अमरावती, नागपूर लोकसभा मतदारसंघातून महास्वामी यांनी आपला अर्ज दाखल केला होता.

 

 

 

 

पण, निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार एका उमेदवाराला दोनपेक्षा जास्त मतदारसंघात अर्ज भरता येत नाहीत. अर्ज दाखल करतेवेळी प्रतिज्ञापत्रात हे नमूद करणे बंधनकारक आहे.

 

 

 

 

दरम्यान, प्रतिज्ञापत्र सादर करताना महास्वामी यांनी आपण चार ठिकाणाहून अर्ज भरत असल्याची माहिती लपवली होती. त्यांचा अर्ज बाद ठरला होता.

 

 

 

 

पण, त्यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याबद्दल त्यांना नोटिस बजावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

 

 

 

त्या अनुषंगाने त्यांनी अर्ज दाखल केल्यासंदर्भातील अहवाल नागपूर आणि अमरावती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवला आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडलेल्या महास्वामी यांच्यासमोर नव्याच अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सोलापूर जिल्ह्यातून आचारसंहिताभंगाच्या एकूण १६६ तक्रारी आल्या आहेत. आयोगाच्या

 

 

सी व्हिजिल ॲपवर १५२, तर ऑफलाईन १४ तक्रारी मिळाल्या आहेत, त्यापैकी ७० तक्रारींमध्ये काही प्रमाणात तथ्य आढळल्याने त्यावर कारवाई केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *