माजी कुलगुरुंवरच्या घरात घुसून निलंबित प्राध्यापकाकडून बेदम मारहाण

The suspended professor barged into the house of the former vice-chancellor and beat him up

 

 

 

नाशिकमधील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापाठाचे ८४ वर्षीय माजी कुलगुरूंवर घरात घुसून निलंबित प्राध्यापकांसह ६ जणांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

 

 

 

ही घटना कल्याण पश्चिम भागातील कर्णिक रोड वरील प्रधान बंगल्यात घडली आहे. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात ६ हल्लेखोरांविरुधात विविध कलामानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

 

 

डॉ. अशोक प्रधान असे हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी माजी कुलगुरूंचे नाव आहे. तर निलंबित प्राध्यापक संजय जाधव (वय ५०), त्याचा साथीदार संदेश जाधव (वय ३२), एक अल्पवयीन आणि एका महिलेसह दोन अनोळखी पुरुष अशी आरोपींची नावे आहेत.

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉ. अशोक प्रधान हे विद्यापीठातून निवृत्तीनंतर गेल्या काही वर्षांपासून शिक्षण समिती सदस्य म्हणून कार्यरत आहेत.

 

 

डॉ. प्रधान यांनी चार वर्षांपूर्वी त्या शैक्षणिक संस्थेतील हल्लेखोर प्राध्यापकाचे गैरवर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे त्यांना कामावरून निलंबित केले होते. त्यामुळे प्राध्यापकाचे वेतन घेणाऱ्या आरोपीचे वेतन बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसला होता.

 

 

 

याच वादातून रविवारी संध्याकाळच्या सुमारास मुख्य आरोपी इतर चार जणांसह प्रधान यांच्या बंगल्यात गेले होते. त्यावेळी बंगल्यात आरोपी प्राध्यापकाने मला नोकरीची खरोखरच गरज आहे.

 

 

म्हणून मला पुन्हा नोकरीवर रुजू करून घ्या, असा तगादा डॉ. प्रधानकडे लावला होता. त्यावेळी प्रधान आणि त्यांची पत्नी बंगल्यात होते.

 

 

मात्र डॉ. प्रधान यांनी नोकरी घेण्यास नकार दिल्याने वाद होऊन काही क्षणातच आरोपी जाधव यांनी डॉ. प्रधान यांच्यावर हल्ला केला.

 

 

 

दरम्यान, डॉ. प्रधान यांच्या पत्नीने ताबडतोब पोलिसांना बोलावले, त्यानंतर महात्मा फुले पोलिस स्टेशनचे एक पथक प्रधान यांच्या बंगल्यावर पोहोचले, त्यांना रुग्णालयात नेले जेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले

 

 

 

आणि उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दुसरीकडे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात भादंवि कलम १४३, १४७, ४५२, ३४१, ५०४, ३४ अन्वये सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्याशी संपर्क साधला असता, डॉ. प्रधान यांनी सुमारे चार वर्षांपूर्वी आरोपी जाधव यांना त्यांच्या अव्यावसायिक वर्तन आणि अनैतिक कामाबद्दल संस्थेच्या अनेक शाखांनी तक्रारी केल्यामुळे

 

 

 

 

त्यांच्या कामावरून निलंबित केले आहे. त्यामुळे जाधव यांचा पगार अचानक बंद झाल्याने त्यांना आर्थिक फटका बसल्यानं त्यांनी याच वादातून हल्ला केल्याचे सांगितले.

 

 

तसेच आरोपींना सीआरपीएस ४१, १(अ) प्रमाणे नोटीस बजावली असून या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक किरण भिसे करीत असल्याचेही सांगितले.

 

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *