8 हजारांची लाच घेताना फौजदाराला अटक
Faujdar arrested while accepting bribe of 8 thousand
गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेणं चांगलंच भोवलं आहे. अवघ्या 8 हजारांची लाच घेताना गोंदियाच्या लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे.
अनिल पारधी (वय 54 वर्ष) असे लाच स्वीकारणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. विशेष म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे.
तक्रारदार यांच्यावर गोंदिया शहर पोलिसात गुन्हा दाखल असून तक्रारदार आणि गैरअर्जदार यांच्यात समझौता करून दिल्याचा मोबदल्यात 10 हजार रुपयाची लाच मागितली होती.
मात्र, तडजोडी अंती 8 हजार रुपयाची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले आहे.
सध्या घडीला गोंदिया शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पोलीस विभागातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिन्याभरातली ही तिसरी मोठी कारवाई आहे.