पाच राज्यांतील निवडणुकीनंतर महायुतीची अमित शाह घेणार बैठक ;या प्रश्नावर होणार चर्चा
Amit Shah will hold a meeting of the Grand Alliance after the elections in five states; the issue will be discussed
पाच राज्यांमधील निवडणुकीची रणधुमाळी समाप्त होताच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग येणार आहे.
राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा करण्यासाठी तसेच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिल्लीमध्ये महायुती सरकारची बैठक दिल्लीमध्ये पार पडणार आहे.
या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असणार आहे. त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या सर्वच राजकीय घडामोडींवर तसेच अत्यंत कळीचा मुद्दा झालेल्या मराठा आरक्षणावर चर्चा होण्याची शक्यता आहे.
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा दिलेली मुदत 24 डिसेंबर रोजी संपत असल्याने एकंदरीतच या बैठकीमध्ये
इतर विषय असतीलच मात्र मराठा आरक्षणावर सर्वाधिक चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या बैठकीसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गट
निमंत्रित असणार की छोट्या घटक पक्षांना सुद्धा या बैठकीत सामील करून घेऊन चर्चा केली जाणार? याकडे सुद्धा लक्ष लागून राहिलं आहे.
या बैठकीमध्ये राज्यातील मराठा आरक्षण त्याचबरोबर ओबीसी आरक्षण, मंत्रिमंडळ विस्तार, त्याचबरोबर उर्वरित जिल्ह्यांमधील पालकमंत्री वाटपाचा तिढा,
महामंडळ वाटप याबाबत सुद्धा चर्चा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेगाने घडू लागणार आहेत.
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी अशी संघर्षाची ठिणगी पडली आहे. या वादात ठिणगी टाकण्याचं काम छगन भुजबळ यांच्याकडून झाल्याने
मराठा समाज छगन भुजबळ विरोधात चांगलाच आक्रमक झाला आहे इतकेच नव्हे तर मराठा आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले मनोज जारंगे पाटील यांनी भुजबळ यांच्यावर तुटून पडताना त्यांना आवरावे अशा भाषेत निर्वाणीचा इशारा राज्य सरकारला दिला आहे.
दुसरीकडे, देशाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाची माहिती दिली.
आमदार अपात्रता सुनावणी ही 18 दिवस चालणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहे. विधानसभा अध्यक्षांनी
सुनावणीच्या तारखा दोन्ही गटासमोर वाचून दाखवल्या. या प्रकरणाची सुनावणी नागपूरमध्येही होणार असल्याचे नार्वेकर यांनी म्हटले आहे.