हिंगोलीकडे जाणाऱ्या भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले ;पोलिसांनी घेतले ताब्यात

A convoy of Bhujbals heading towards Hingoli displayed black flags; the police took them into custody

 

 

 

हिंगोली येथील ओबीसी मेळाव्याला जाणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या ताफ्याला मराठा समाज बांधवांकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे.

 

 

ओबीसी सभेसाठी भुजबळ काही वेळापूर्वी नांदेड येथील विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर, तेथून त्यांचा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला होता.

 

 

 

दरम्यान, याचवेळी मराठा आंदोलकांकडून भुजबळ यांच्या गाडीला काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे, पोलिसांनी तात्काळ धाव घेत तीन आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. तर भुजबळ यांचा ताफा हिंगोलीच्या दिशेने निघाला आहे.

 

 

 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 

 

दरम्यान, या ओबीसी मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यासाठी भुजबळ नांदेड येथील विमानतळावर पोहचले असून, त्यांचा ताफा हिंगोलीकडे निघाला आहे.

 

 

 

मात्र, याचवेळी मराठा आंदोलकांनी भुजबळ यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचा प्रयत्न केला. तसेच, घोषणाबाजी देखील केली. मात्र, आधीपासूनच तैनात असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच

 

 

 

त्यांनी तिघांना ताब्यात घेतले. तसेच, त्यांना स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. तर, भुजबळांचा ताफा आता हिंगोलीच्या सभेच्या दिशेने रवाना झाला आहे.

 

 

एकीकडे भुजबळ यांच्या ताफ्याला नांदेडमध्ये काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला असून, दुसरीकडे त्याच नांदेडमधील हिमायतनगरमध्ये छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करण्यात आला आहे.

 

 

 

हिंगोलीच्या रामलीला मैदानावर आज होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला हिमायतनगर शहरातील हजारो ओबीसी बांधव उपस्थित राहणार आहे.

 

 

दरम्यान, शहरातील श्री परमेश्वर मंदिर परिसरात ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या फोटोला दुग्ध अभिषेक करण्यात आले.

 

 

 

तसेच यावेळी ‘हमारा नेता कैसा हो, छगन भुजबळ जैसा हो, जो ओबीसी की बात करेगा, वही देश पे राज करेगा, अशी घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यानंतर हजारो कार्यकर्ते सभेसाठी रवाना झाले आहेत.

 

 

 

हिंगोली येथील सभेला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

 

 

सोबतच, सभेसाठी येणाऱ्या मार्गावर देखील पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. वरिष्ठ अधिकारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तसेच, सभेच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले असून, त्या माध्यमातून पोलीस सभेवर लक्ष ठेवत आहे.

 

 

दरम्यान हिंगोलीत होणाऱ्या ओबीसी मेळाव्याला काही तासांत सुरवात होणार असून, त्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे.

 

 

“भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे? संताजी, धनाजी सारखा मिच दिसतोय. संताजी, धनाजी जसे त्यांना पाण्यात दिसत होते. तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय अशी टीका जरांगे यांनी केली आहे.

 

 

 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीस आरक्षण देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी आज हिंगोलीत ओबीसी मेळावा होत आहे. ज्यात मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती महत्वाची असणार असून, त्यांच्याकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे.

 

 

 

मात्र, त्यापूर्वीच जरांगे यांनी भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. “भुजबळांना टीका करण्यासाठी माझ्याशिवाय कोण आहे?, संताजी-धनाजी सारखा मिच दिसतोय. जसे संताजी, धनाजी पाण्यात दिसत होते, तसा मी दिसतोय आणि माझा समाज दिसतोय, असे जरांगे म्हणाले.

 

 

 

दरम्यान हिंगोलीत होत असलेल्या सभेवर प्रतिक्रिया देतांना जरांगे म्हणाले की, “लोकशाहीत सर्वांना सभा घेण्याचा अधिकार आहे. माझ्याकडे कामच खूप आहे,

 

 

त्यामुळे आजची सभा बघणार नाही. लोकं खुप भेटायला आले आहे. सलाईन लावले आहे, आज उद्या उपचार घेणार आणि त्यानंतर आंतरवालीत आंदोलना ठिकाणी जाईल, असे जरांगे म्हणाले.

 

 

मनोज जरांगे यांनी सल्लागारांचे सल्ले ऐकून चालू नयेत असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते. यावरच बोलतांना जरांगे म्हणाले की, “प्रकाश आंबेकडर यांना मी पण खूप मानतो.

 

 

आमच्या समाजातील अनेक तरुण त्यांना मानतात. जे काही आहे ते स्पष्टच बोलतात. त्यांचा स्पष्टपणा सर्वांनी पाहिला असून, मी सुद्धा त्यांच्या स्पष्टपणाला मानतो. पण माझ्यामागे कोणी सल्लागार नाही.

 

 

आंबेकडर यांचा सल्ला मी मान्य केला आहे. माझ्या आणि त्यांच्या वयात खुप तफावत आहे. माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा होता, काही जणांनी एका समुदायाकडे तो नेला.

 

 

सर्व समाजाबद्दल मला आदर आहे. मला वेगळं म्हणायचं होतं, पण काही जणांनी राजकारण केलं. आंबेडकरांचा सल्ला मान्य, पण विनाकारण अंगावर ओढून घेतलं अस करायला नको. एखाद्याचा मोठा लढा आहे, त्याच्याविषयी संभ्रम राज्यात नको निर्माण करायला पाहिजे,” असेही जरांगे म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *