अजित दादा अडचणीत ; शिखर बँक घोटाळ्यात क्लीन चिटला कोर्टात आव्हान
Ajit Dada in trouble; Clean chit in Shikhar Bank scam challenged in court
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेतच. शिखर बँक घोटाळा प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली होती,
त्याला आता नव्याने आव्हान देण्यात आलं आहे. सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांकडून मुंबई सत्र न्यायालयात निषेध याचिका सादक करण्यात आली आहे.
या याचिकेवर २५ जुलैला सुनावणी होणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अजित पवारांची चिंता वाढण्याची शक्यता आहे.
शिखर बँकेच्या २५ हजार कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं काही दिवसांपूर्वी विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. त्यामध्ये अजित पवार,
त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांसह बँकेच्या ८० संचालकांना क्लीन चिट देण्यात आली होती. त्यामुळे अजित पवारांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र, त्यानंतर अंमलबजावणी संचालनालयाने (इडी) आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता सहकार क्षेत्रातील सात कारखान्यांनी
मुंबई सत्र न्यायालयान याविरोधात निषेध याचिका दाखल केली आहे. या निषेध याचिकेवर २५ जुलैला न्यायालयान सुनावणी होणार आहे.
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी जरंडेश्वर, जय अंबिका, जालना, पारनेर, कन्नड, प्रियदर्शिनी, पद्मर्षी विखे-पाटील या सहकारी साखर कारखान्यांनी निषेध याचिका दाखल केली आहे.
मुंबई सत्र न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जुलैला या याचिकेवर पुढील सुनावणी होणार आहे.
आर्थिक गुन्हे शाखेनं सप्टेंबर २०२० मध्ये शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी पहिल्यांदा क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
पण, न्यायालयाने तो क्लोजर रिपोर्ट स्वीकारला नव्हता. मूळ याचिकाकर्त्याने या क्लोजर रिपोर्टला विरोध केला होता. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये
आर्थिक गुन्हे शाखेनं स्वत:हूनच आपण या प्रकरणाचा तपास करु, असं न्यायालयाला सांगितलं होतं. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेनं या प्रकरणात अजित पवारांना क्लीन चिट दिली होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवार यांना ईओडब्ल्यूने क्लीन चीट दिली होती.
परंतु आता ईडीकडून अजित पवारांच्या क्लीन चीटला आव्हान देण्यात आले आहे. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” शिखर बँक घोटाळ्यासंदर्भात क्लीन चीट मिळणं हाच सर्वात मोठा घोटाळा आहे.
हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे आरोप करायचे. पुन्हा त्यावर खटला चालवण्यासाठी सरकारच्या खात्यातून लाखो रुपये खर्च करायचे. नंतर तो आरोपी पक्षात आला की त्याच्यासोबत गोड वागायचे.
खटला सुरू असताना होणारा खर्च कुणाकडून घेणार आहात? नरेंद्र मोदींकडून घेणार आहात का? ” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
राऊत यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत झालेल्या क्रॉस व्होटिंगवर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की ” विधानपरिषदेच्या निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झालं हे कॉंग्रेसने मान्य केलं आहे.
ज्या लोकांनी क्रॉस व्होटिंग केलं त्यांना मोठ्या प्रमाणात पैसे आणि जमीन देण्यात आली. आमदारांना पैसे देऊन मत फोडणे ही संविधानाची हत्या नाही का?
अमित शहा आणि नरेंद्र मोदी हेच खरे संविधानाची हत्या करत आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या आमदारांचा आणि चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव घडून आणला. त्यामुळे कॉंग्रेस फुटीर आमदारांवर नक्कीच कारवाई करेल.”
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली यावर संजय राऊत म्हणाले की,
” चंद्राबाबू आणि महाराष्ट्र या दोघांचे काय समीकरण आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या राज्यातील आलेले मुख्यमंत्री भेटत असतात हा शिष्टाचाराचा भाग आहे. त्यामुळे हुरळून जाण्याची गरज नाही”.