एक रुपया टॅक्स भरण्यासाठी करावे लागले पन्नास हजार खर्च

Fifty thousand had to be spent to pay one rupee of tax

 

 

 

आयटीआर भरण्याची शेवटची तारीख जवळ येत आहे. 31 तारखेपर्यंत आयटीआर फाईल करता येणार आहे. ही तारीख जशी-जशी जवळ येत आहे,

 

तसं तसं लोक आयटीआर भरण्यासाठी लगबग करत आहेत. दरम्यान, आयटीआर भरताना योग्य काळजी घेणं गरजेचं आहे.

 

यात काही चूक झाल्यास तुम्हाला प्राप्तिकर विभागाची नोटीस येऊ शकते. प्राप्तिकर विभागाची नोटीस आल्यानंतर एका व्यक्तीची

 

अशीच फजिती झाली आहे. एक रुपयाचा घोळ झाल्यामुळे या व्यक्तीला तब्बल 50 हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागला आहे.

 

सध्या प्राप्तिकर विभागाने पाठवलेल्या या निटिसीची सगलीकडे चर्चा आहे. एका करदात्याने फक्त एक रुपयाच्या वादात तब्बल 50 हजार रुपये घालवले आहेत.

 

ही घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार संबंधित करदात्याने स्वत:च शेअर केला आहे. या प्रकाराबाबत माहिती देत त्याने प्राप्तिकर विभागाबाबत आपली नाराजी उघड केली आहे.

 

करदात्याने एक्स या समाजमाध्यमावर याबाबत माहिती दिली आहे. या व्यक्तीचे नाव अपूर्व जैन असे आहे. प्राप्तिकर विभागाच्या एका पोस्टर त्याने प्रतिक्रिया देताना त्याने घालवलेल्या 50 हजार रुपयांबाबत माहिती दिली आहे.

 

“मला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळाली होती. या नोटिसीला उत्तर देण्यासाठी मी सीएशी संपर्क साधला होता. हे प्रकरण मिटवण्यासाठी मी 50 हजार रुपये फी दिली.

 

नंतर मला समजलं की फक्त एक रुपयाची गफलत झाली होती. म्हणजेच एका रुपयासाठी मला 50 हजार रुपये भरावे लागले.

 

अपूर्व जैन यांने केलेले ट्वीट सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. इंटरनेट युजर्स यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रकार थेट प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास आला.

 

त्यानंतर विभागाने दु:ख व्यक्त केलं आहे. दुसरीकडे अपूर्वने प्राप्तिकर विभागाच्या कार्यप्रणालीत सुधारणा व्हावी अशी मागणी केली आहे. अपूर्वच्या कमेंटवर अनेक करदात्यांनी प्राप्तिकर विभागाप्रती आपली नाराजी व्यक्त केली आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *