कोल्हापूर येथील हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीत धरणे आंदोलन

Dharne movement in Parbhani to protest the attack in Kolhapur

 

 

 

 

14 जुलै रोजी कोल्हापूर येथील विशाल गडावरच्या जुमा मज्जिद वर हिंदुत्ववादी समाजकंटकाकडून झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कुल हिंद मजलीस ए इतेहादुल मुसलेमीन युनिट परभणी तर्फे

 

धरणे आंदोलनाची हाक देण्यात आली आहे . हे धरणे आंदोलन 19 जुलाई शुक्रवार रोजी दुपारी दोन वाजून 30 मिनिटांनी परभणीतील जंतर-मंतर मैदानात होणार आहे.

 

तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की या धरणे आंदोलनात सहभाग घ्यावा असे आव्हान पक्षाचे जिल्हाध्यक्ष ऍड . इम्तियाज खान यांनी केला आहे.

 

पुढे बोलताना ऍड इम्तियाज खान म्हणाले की गेल्या 14 जुलै रोजी काही हिंदुत्ववादी समाजकंटकाकडून अतिक्रमण हटवण्याच्या नावाखाली विशालगडावर लाठ्या -काठ्या व तलवारी घेऊन जमा झाले

 

जय श्रीराम च्या घोषणा देत तिथल्या मस्जिदवर हल्ला चढविला, मशिदीचे विटंबना केली तसेच धार्मिक ग्रंथ व साहित्याची नासधूस केली. स्थानिक मुस्लिमांचे घरावरही हल्ला चढविला

 

ही घटना असंवैधानिक असून एसआयटी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी व गुन्हेगारांना तत्काळ अटक करावे, या घटनेला प्रोत्साहन देणाऱ्या ला मुख्य आरोपीवर तात्काळ गुन्हे दाखल करावे ,

 

या मागण्यासाठी 19 जुलै शुक्रवार रोजी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे . या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे

 

असे आवाहन मजलीस ए इतेहादुल मुसलेमीन चे जिल्हा अध्क्ष एडवोकेट इम्तियाज खानन यांनी एका प्रसिद्धी पत्रका द्वारे केले आहे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *