पावसामुळे दहावी,बारावीचे पेपर रद्द ;पाहा कधी होणार परीक्षा ?

10th, 12th class papers canceled due to rain; when will the exam be held?

 

 

 

राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाल्यानंतर मुसळधार पावसाने जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघरमधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याचे प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहे. राज्यातील काही ठिकाणी हवामान खात्याने रेड अलर्ट दिल्याने

 

 

10वी व 12वीच्या उद्या होणारी पुरवणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 10वी चे पुढे ढकलण्यात आलेला पेपर 31 जुलै रोजी तर 12 वीचे पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

 

राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडत आहे. आज मुंबई, ठाणे, कोकण आणि आजूबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस झाला. तर महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

 

या पार्श्वभूमीवर उद्या (25 जुलै) होणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. 26 जुलै रोजी होणारा

 

दहावी बोर्डाचा पुरवणी परीक्षेचा पेपर 31 जुलै रोजी होणार आहे.तर बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचा उद्याचा पेपर 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

26 जुलै रोजी दहावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा विज्ञान व तंत्रज्ञान भाग 2 चा पेपर सकाळी 11 ते दुपारी 1 दरम्यान नियोजित होता.

 

मात्र आता हा पेपर 31 जुलै रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 दरम्यान होईल. तर बारावी बोर्डाच्या पुरवणी परीक्षेचा वाणिज्य आणि संघटन व्यवस्थापन ,

 

अन्नशास्त्र व तंत्रज्ञान, एमसीव्हीसी पेपर-2 हे तीन पेपर होते. हे बारावी बोर्ड पुरवणी परीक्षेचे तीन पेपर आता 9 ऑगस्ट रोजी होणार आहे.

 

मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये उद्याही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे लोकल सेवा आणि वाहतूक सेवावर त्याचा परिणाम झाला आहे.

 

म्हणून मुंबई, ठाणे आणि पालघरमधील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर कोकणात येत्या 48 तासांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

त्यामुळे आज या ठिकाणच्या शाळा बंद ठेवण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. तर इतर जिल्ह्यातील शाळा बंद ठेवायच्या का नाहीत ते त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून ठरवण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *