मुख्यमंत्र्यांसमोर त्यांच्याच आमदाराने व्यक्त केली मनातील खदखद

His own MLA expressed his grief in front of the Chief Minister

 

 

 

नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांचा संभाजीनगरात जाहीर सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा पालकमंत्री पदाबद्दल बोलून पक्षाला घरचा आहेर दिला.

 

पालकमंत्री पद मिळत नसल्याने संजय शिरसाट नाराज असल्याची दबक्या आवाजात मागील काही दिवसांपासून होती आज पुन्हा पालकमंत्री पदाच्या विषयाला हात घेतला आहे.

 

संदिपान भुमरे यांना खासदार म्हणायला अवघड वाटतं. संदिपान भुमरे हे पालकमंत्री बरे होते. माझ्या कार्यकाळामध्ये दोन दोन पालकमंत्री झाले. मी कधी होईल हे संदिपान भुमरे तुम्ही तरी सांगा.

 

पालकमंत्री हे लोक होतात अन् पत्रकार मला विचारतात तुमचं काय झालं? मात्र जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं शिवसेना प्रवक्ते आमदार शिरसाट म्हणाले.

 

नवनिर्वाचित खासदार संदिपान भुमरे यांच्या सत्कार समारंभ मध्ये बोलताना मंत्री पदाच्या प्रतीक्षेत असलेल्या संजय शिरसाट यांनी ही भावना व्यक्त केली आहे, आणि कार्यकर्त्यांमध्ये हसा पिकला.

पुढे संजय शिरसाट म्हणाले, की शिंदे साहेब आणि भाजपने आम्हाला ताकद दिली. आमदार खासदार असतील त्यांचासोबत विकासकामांसाठी भांडा, मनात काही ठेवू नका.

 

आज विधानसभेच्या खुर्चीवर कधीकधी अध्यक्ष म्हणून बसतो हा मान कार्यकर्त्यांनी दिला त्याच्यांमुळे मी खुर्चीवर बसलोय. कार्यकर्त्यांना प्रश्न मांडायला अडचण वाटते

 

पण असे करु नका माझ्याकडे आलेला प्रत्येक कार्यकर्त्यांचे काम करण्याचा मी प्रयत्न करतो असे शिरसाट म्हणाले.

 

पुढे शिरसाट यांनी संदिपान भुमरे आणि आपली एक राशी असल्याचे भाष्य केले. कुंभ राश डेंजर असते असे संजय शिरसाट म्हणाले. संजय नावाने मी परेशान असे विधानसभेत चौदा संजय आहेत

 

आणि ‘सकाळचा भोंगा’ एक संजय म्हणजे या संजय नावाने खरी राजकरणाला रंगत आले असे संजय शिरसाट म्हणाले अशी उपहासत्मक टीका

 

संजय शिरसाटांनी केली आहे. संदिपान भुमरेंना जेव्हा विचारले लोकसभा निवडून येणार का? तर भुमरे म्हणायचे शंभर टक्के असे प्रतिपादन संजय शिरसाटांनी केली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *