चित्रा वाघ यांना न्यायालयाने सुनावले खडेबोल
Chitra Wagh was given harsh words by the court
बीडमधील परळी या ठिकाणी राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने काही वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन तिने जीवन संपवले होते.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी यवतमाळचे आमदार संजय राठोड दोषी असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याप्रकरणी कोर्टातही धाव घेतली होती. पण त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्या बदललेल्या भूमिकेवरुन उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे.
पूजा चव्हाण हिने फेब्रुवारी 2021 मध्ये इमारतीच्या पहिल्या मजल्यावरुन उडी मारली होती. याप्रकरणी शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा
, या मागणीसाठी चित्रा वाघ यांनी जनहित याचिका दाखल केली होती. चित्रा वाघ यांनी तीन वर्षांपूर्वी उच्च न्यायालयात याप्रकरणी याचिका दाखल केली होती.
यानंतर काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी न्यायालयाने ही याचिका निकाली काढावी किंवा ती मागे घेण्याची मुभा द्यावी, अशी मागणी उच्च न्यायालयात केली होती.
आता याप्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने चित्रा वाघ यांना खडे बोल सुनावले. तुमच्यासारखे
अनेक राजकारणी जनहित याचिकांच्या माध्यमातून राजकारण करत आहेत. तसेच या माध्यमातून न्यायालयांना विनाकारण त्यात ओढले जात आहेत, असे न्यायालयाने म्हटले.
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर ही याचिका पार पडली. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार तुमची भूमिका बदलते
आणि राजकारण करण्यासाठी जनहित याचिकांचा माध्यम म्हणून वापर करून न्यायालयांना त्यात ओढले जात आहे. राजकारण करण्याचा हा मार्ग नाही
आणि तो कधीही योग्य नाही, असे ताशेरे न्यायालयाने चित्रा वाघ यांच्यावर ओढले. यानंतर चित्रा वाघ यांनी याचिका मागे घेणार नसल्याचे स्पष्टीकरण वकिलामार्फत न्यायालयाला दिले.
7 फेब्रुवारी 2021 रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातल्या वानवडी परिसरात आत्महत्या केली.
पूजा चव्हाण ही मूळची बीडची असून ती टिकटॉक स्टार म्हणून प्रसिद्ध होती.
आत्महत्येपूर्वी काही दिवसांपासून ती पुण्यात स्थायिक होती.पूजा चव्हाणच्या आत्महत्ये प्रकरणी यवतमाळचे आमदार संजय चव्हाण दोषी असल्याचा ठपका देवेंद्र फडणवीस
आणि भाजप महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी ठेवला होता.पूजा चव्हाण आणि संजय राठोड यांच्या कथित फोन संभाषणाच्या ऑडिओ क्लिपदेखील भाजपने सादर केल्या होत्या.
त्यानंतर महाविकास आघाडीत वनमंत्री असलेले संजय राठोड यांना मंत्रिपद गमवावे लागले होते.पूजाच्या आई-वडिलांनी मात्र जबाबात कोणतीही तक्रार दिली नव्हती.
यादरम्यान चित्रा वाघ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.महाविकास आघाडी सरकारमध्येच पुणे पोलीस स्टेशनने काही काळानंतर संजय राठोड यांना क्लिन चीट दिली.
त्यानंतर संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद दिले जाण्याची मागणी जोर धरू लागली.जून-जुलै 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळलं
आणि एकनाथ शिंदे-भाजप सरकार आलं. एकनाथ शिंदे गटात संजय राठोड शामिल झाले.यानंतर चित्रा वाघ यांनी ही याचिका निकाली काढावी, अशी मागणी केली.या मागणीवर उच्च न्यायालयान ताशेरे ओढले.