महायुतीत तणाव;शिंदे गटाचे आमदार म्हणाले राष्ट्रवादी विश्वासघातकी पार्टी
Tensions in Grand Alliance; MLAs of Shinde group said NCP is a treacherous party

महायुतीमधील विसंवाद हळूहळू समोर येऊ लागला आहे. काल भाजपच्या जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा सुरु आहे. ही यात्रा जुन्नरमध्ये आली होती. त्यावेळी हा प्रकार घडला. महायुतीच सरकार असताना जनसन्मान यात्रेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्य घटक पक्षांना डावलण्यात येतय
असं जुन्नर भाजपा पदाधिकाऱ्यांच म्हणण होतं. त्यावर जनसन्मान यात्रा हा पक्षाचा व्यक्तीगत कार्यक्रम आहे असं राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं.
अशा बुचके यांना स्ंटट करण्याची गरज नव्हती, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं. महायुतीमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याच हे चिन्ह होतं.
त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला विश्वासघातकी म्हटलय. कर्जत जिल्ह्याला लाभलेले नेतृत्व विश्वाघातकी आहे.
महायुतीमध्ये गद्दारी खपवून घेणार नाही अशी टीका शिवसेना शिंदे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली. कर्जत जिल्ह्याला लाभलेले नेतृत्व विश्वाघातकी आहे असं म्हणण्यामागे त्यांचा रोख सुनील तटकरे यांच्याकडे होता.
कर्जत विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतो. रायगडमध्ये सुनील तटकरे यांचं वर्चस्व आहे. रायगडमधून सुनील तटकरे दुसऱ्यांदा निवडणूक जिंकून लोकसभेवर गेले.
कर्जत खालापूर मतदार संघात महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात वॉर रंगलय. शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी प्रत्युतर दिलय. “
आमदार महेंद्र थोरवे हे स्वतःच विश्वासघातकी आहेत. विश्वासघात कोणी आणि कोण करतंय हे दुनियेला माहीत आहे” असं अजित पवार गटाकडून सुधाकर घारे यांनी उत्तर दिलय.
तसेच विधानसभा तिकीटासाठी मतदार संघातील महायुतीतून एक गट बाहेर पडण्याची देखील शक्यता असल्याच म्हटलं जातय.